Washim : मोठा राडा! पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट; आमदार नितीन देशमुख पालिसांच्या ताब्यात

वाशिममध्ये समृद्धी महामार्ग अडवल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटाबट झाली. यावेळी पोलिसांनी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं.

| Updated on: Oct 30, 2026 | 2:21 PM
1 / 5
वाशिममध्ये मोठा राडा झाला आहे. वाशिममध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग रोखला आहे.

वाशिममध्ये मोठा राडा झाला आहे. वाशिममध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग रोखला आहे.

2 / 5

अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलाय. त्यात शासनाची पाच हजारांची मदत तुटपुंजी असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यानंतर शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने करत समृद्ध महामार्ग अडवला.

3 / 5

समृद्धी महामार्गावरील आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर आंदोलकांनी शासनावर एकच संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांनाही ताब्यात घेतलं.

4 / 5

वाशिम जिल्ह्याच्या वनोजा येथे समृद्धी महामार्गावर पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली होती. त्यानंतरही ठाकरे गटाने आंदोलन केलं.

5 / 5

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राहावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दीड हजार पोलीस कर्मचारी तैनात केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us