‘वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’.. पिंपरीत भंगार साहित्यांतून साकारतायत सुंदर कलाकृती

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे, महाराष्ट्रातील पहिले "वेस्ट टू वंडर वर्ल्ड" थीम पार्क उभारले जात आहे. टाकाऊ भंगार साहित्यापासून बनवलेल्या जगातील 7 आश्चर्यांसह अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती येथे आहेत. हा प्रकल्प पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो आणि पर्यटनाला चालना देईल. 11.02 कोटी रुपये खर्च करून हे पार्क लवकरच नागरिकांसाठी खुले होईल.

| Updated on: Jul 11, 2025 | 1:28 PM
1 / 8
मनोरंजनाच्या जोडीला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे, महाराष्ट्रातील पहिले 'वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क' पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागात साकारण्यात येत आहे.

2 / 8
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात हे अनोखे थीम पार्क उभारले जात आहे.

3 / 8
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील टाकाऊ भंगार वस्तूंपासून या थीम पार्कमध्ये जगभरातील प्रसिद्ध 17 ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती तयार केल्या जात आहेत. यात जगातील 7 आश्चर्यांचा देखील समावेश आहे.

4 / 8
प्रामुख्याने ताजमहल,आयफेल टॉवर, बुर्ज खलिफा, टॉवर ऑफ पिसा, सिडनी ऑपेरा हाऊस, अजिंठा लेणी, गिझाचा पिरॅमिड, लंडनमधील बिग बेन,स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ट्रेव्ही फाउंटन,माउंट रशमोर यांचा समावेश आहे.

5 / 8
या सर्व प्रतिकृती नागरिकांना एकाच ठिकाणी जागतिक स्थापत्यकलेचे दर्शन घडवतील.

6 / 8
पर्यटनाला चालना आणि शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या प्रकल्पासाठी एकूण 11.02 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

7 / 8
हे थीम पार्क लवकरच पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुले केले जाईल

8 / 8
या थीम पार्कमुळे पर्यावरणाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल आणि टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला जाईल.