Weather Alert : वारं फिरलं, महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट, थेट..
Weather Alert : राज्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यातून मॉन्सून गेल्याचे हवामान विभागाने जाहीर केले पण पुन्हा वारे फिरले आहे.

राज्यातून मॉन्सून गेल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. त्यातच आता पुन्हा एकदा वारे फिरल्याचे बघायला मिळतंय. राज्यातील बहुतांश भागात पावसाच उघडीप बघायला मिळतंय.
त्यातच काही भागात ऑक्टोबर हिटचा तडाखा बघायला मिळतोय. भारतीय हवामान विभागाने 6 ऑक्टोबरसाठी पावसाचा मोठा इशारा दिला. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर हलका पाऊस कोसळू शकतो. सिंधुदुर्ग भागात पाऊस हजेरी लावेल. यादरम्यान 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.
पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागाता पाऊस होणार नाही. कोल्हापूर आणि सातारा घाटमाथावर विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या दोन्ही भागात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. राज्यात पुन्हा पाऊस धो धो कोसळणार आहे.