
जेव्हा बाळ जन्माला येते त्याच्या किंकाळ्यांनी हॉस्पिटल दणाणून जाते. ते आपल्या इवल्या इवल्या डोळ्यांनी काय काय पाहत असेल याची आपल्याला नवलाई वाटते. बाळ जन्माला येते तेव्हा ते रडते. त्याला मागील जन्मातील घटना आठवतात. देव दिसतो असे म्हटले जाते. खरंच जन्मानंतर मुलांच्या मनात असं काही सुरू असतं का?

जन्मापूर्वी मूल हे आईच्या पोटात असते. त्यानंतर ते प्रसुतीनंतर बाहेर येते. उबदार आणि सुरक्षित जागेतून ते अचानक वातावरण आल्याने त्याला असुरक्षित वाटते. ते घाबरून जाते. जागा बदलल्याची ही अनामिक भीती असते.

जन्मजात बाळाला फार दुरचे दिसत नाही. त्यांची नजर पक्की व्हायला वेळ लागतो. त्यांची दृष्टी जवळपास 8-12 इंच असते. त्यात त्याचा बुद्धीचा विकास झालेला नसल्याने त्याला भीती वाटणे सहाजिक असते

जन्मानंतर बालकांची ऐकण्याची, वास घेण्याची आणि जाणीव होण्याची क्षमता विकसीत होण्यास सुरुवात होते. आईकडून त्याला दूध मिळते. बाळ आईजवळ असल्याने तिच्याकडेच त्याचा ओढा असतो. जन्मापूर्वी ते आईच्या पोटात असते आणि आईशी समरस झालेले असते. आईच्या कुशीत त्यामुळेच त्याला सुरक्षित वाटते.

जन्मानंतर बाळाला मागील जन्मातील कृत्य, आई-वडील, नातेवाईक, पत्नी, मुलं दिसतात. देव दिसतो असे सांगितले जाते. अर्थात ही भावनिक गोष्ट आहे. त्याला वैज्ञानिक आधार नाही. मुलं ही देवा घरची फुलं असतात म्हणून घरातील ज्येष्ठ अशा प्रकारचा अंदाज वर्तवतात. नवजात बाळाची बुद्धी इतकी विकसीत नसते की ती देवाला समजू शकेल, असा विज्ञान दावा करते.

पण जवजात बालकाला देव दिसतो. मागील जन्म आठवतो हे सांगण्यामागे एक प्रकारची धार्मिक श्रद्धा असते. तो देवाशी जोडल्या गेल्याचे जणू ते प्रतिक असते. ही एक सुंदर भावना आहे. पण त्याला विज्ञानाच्या परिभाषेत स्थान नाही.