
गरुड पुराणात अकाली झालेला मृत्यू सर्वात कठीण आणि कष्टदायक मानला जातो. आत्महत्या, मोठा आजार, हत्या, अपघात या माध्यमातून झालेल्या मृत्यूला अकाली मृत्यू म्हटले जाते. अकाली मृत्यू झाल्यावर काय होते, याची माहिती गरुड पुराणात दिलेली आहे.

गरुड पुराणाणुसार नैसर्गिक पद्धतीने मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीची आत्मा यमदूत घेऊन जातो. मात्र अकाली मृत्यू झाला असेल तर क्रूर आणि उग्र असे यमदूत येतात. हे यमदूत आत्म्याला त्रास देतात, असे गरुड पुरणात सांगितलेले आहे.

आकाली मृत्यू झालेला असेल तर संबंधित व्यक्तीची आत्मा लगेच यमलोकात जात नाही. गरुड पुराणामुसार ज्या मृतदेहातील आत्मा यमलोकात लगेच जात नाही, अशा व्यक्तीच्या प्रेताला भूक लागते.

परंतु त्या प्रेताला काहीच खायला मिळत नाही. त्यामुळे तो मृतदेह कुटुंबातील व्यक्तीला आवाज देतो, असे गरुड पुराणात सांगितलेले आहे. अशा स्थितीत संबंधित व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी केले जातात.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.