Pranit More : बापरे बाप! वादात अडकलेला प्रणित मोरे करोडोंचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!
या प्रकरणात चूक लक्षात आल्याने प्रणित मोरे याने जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, प्रणित मोरे चर्चेत आल्यानंतर आता त्याची कमाई किती आहे, तो किती श्रीमंत आहे, असे विचारले जात आहे.

कॉमेडियन प्रणित मोरे सध्या चांगलाच वादात सापडला आहे. त्याने आयोजित केलेल्या कॉमेडी शोमध्ये एका तरुणाने 370 रुपयांची बिर्याणी आणि तरुणीसोबत शारीरिक संबंध यावर भाष्य केलेल्याने या तरुणावर तसेच प्रणित मोरे याच्यावर सडकून टीका होत आहे.

या प्रकरणात चूक लक्षात आल्याने प्रणित मोरे याने जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, प्रणित मोरे चर्चेत आल्यानंतर आता त्याची कमाई किती आहे, तो किती श्रीमंत आहे, असे विचारले जात आहे.

प्रणित मोरे एक लाईव्ह शो करण्यासाठी 50000 ते 100000 रुपये घेतो, असा अंदाज लावला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रणित मोरे याची एकूण संपत्ती ही साधारण 4 ते 8 कोटी रुपये असू शकते.

प्रणित मोरे याचे घरदेखील आलिशान आहे. प्रणित मोरेच्या लाईव्ह शोसाठी लोकांची गर्दी असते. लोक तिकीट खरेदी करून हा शो बघायला जातात. या तिकिटामधूनही त्याची कमाई होते.

प्रणित मोरे याचे सोशल मीडियावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत. आता त्याच्यासोबत अनेक ब्रँड्सने जाहिराती केलेल्या आहेत. त्यामुळे या जाहिरातींमधूनही तो लाखो रुपये कमावतो.