
जवानांचं आयुष्य हे सामान्य माणसांसारखं नसतं. त्यांची दिनचर्या ही सामान्यांपेक्षा वेगळी असते. शरीराने तंदुरुस्त राहण्यासाठी ते दररोज व्यायाम करतात.

एखाद्या मोहिमेवर निघताना जवानांना त्यांना रोज लागणारं सर्व सामान बॅगमध्ये भरून न्यावं लागतं. विशेष म्हणजे या सामानासह कधीकधी जवान आपल्या शत्रूशी दोन हात करतात.

कित्येक किलोंचं ओझं पाठीवर घेऊन जवान आपल्या मोहिमेवर असतात. त्यामुळे मोहिमेवर गेल्यानंत रोजच्या वापरतील सर्व सामान सोबत नेता यावे यासाठी जवान सामान बांधण्यासाठी खास तंत्र वापरतात.

जवान आपले कपडे पॅक करण्यासाठी खास रेंजर रोल म्हणजेच आर्मी रोल ही पद्धत वापरतात. ही पद्धत वापरल्यामुळे बॅगमध्ये कमी जागेत जास्त कपडे आणि सामान बसते.

रेंजर रोल म्हणजेच आर्मी रोल पद्धतीमध्ये कपड्यांची घडी सामान्य पद्धतीने घातली जात नाही. रेंजर रोल ही कपड्यांना घडी घालण्याची एक खास पद्धत आहे. या पद्धतीचा वापर केल्यास कपडे बॅगमध्ये ठेवण्यासाठी खूप कमी जागा लागते. तसेच कपडे बॅगमध्ये भरताना त्याची घडीदेखील उकलत नाही.
