खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी?

खुर्चीवर बसून काम करणाऱ्यांना हृदयवकिराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच सायलेंट हार्ट अटॅकपासून सावध राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

| Updated on: Sep 03, 2025 | 9:07 PM
1 / 7
आजकाल हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्येही हृदयविकारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळेच तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच योग्य काळजी घ्यावी, असे म्हटले जात आहे.

2 / 7
सध्या एका खुर्चीवर बसून काम करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी तर वर्क फ्रॉम होमचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कित्येक तास एका जागेवर बसून काम केल्याने हॉर्ट अटॅक येण्याची शक्यता वाढली आहे. म्हणूनच सायलेंट हॉर्ट अटॅकपासून वाचण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

3 / 7
जास्त वेळ एकाच जागेवर बसून राहणे फार धोकादायक ठरू शकते. एकाच जागेवर बसून काम केल्याने तुमच्या शरीरावर हळूहळू   काही गंभीर परिणाम व्हायला सुरुवात होते. यातूनच नंतर हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो.

4 / 7
त्यामुळेच हार्ट अॅटकच्या धोक्यापासून दूर राहण्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. दररोज शरीराची स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे. तसेच जेवणात आपण काय काय पदार्थ खातोय याकडेही लक्ष देणे फार गरजेचे आहे.

5 / 7
रोज संतुलित आहार घ्यायला हवा. धुम्रपान, मद्यपान यापासून दूर राहावे. खुर्चीवर बसून काम करताना प्रत्येक 30 ते 40 मनिटांनी उभे राहावे. कित्येक तास एकाच जागेवर बसू नका.

6 / 7
सायलेंट हार्ट अटॅक टाळण्यासाठी पुरेशी झोप घ्या. तसेच नियमित आरोग्य तपासण्या करा. व्यायामही रोज करायला विसरू नये. अशा प्रकारची खबरादरी घेतली तर खुर्चीवर बसून काम करणारे हृदयविकाराच्या झटक्यापासून स्वत:ला वाचवू शकतात.

7 / 7
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)