
आपल्या देशात रेल्वेचं मोठं आणि विस्तृत असं जाळं आहे. भारतात एका मिनिटात शेकडो रेल्वे धावत असतात. प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन केल जात असल्यामुळेच भारतातील या रेल्वे यशस्वीपणे प्रवास करतात.

रेल्वेच्या प्रवासासाठी रेल्वेरुळावर लागलेले सिग्नल आणि संकेत खूप महत्त्वाचे असतात. रेल्वेचा पुढचा प्रवास कदी चालू करायचा आणि कुठे रेल्वे थांबवायची हे याच सिग्नल आणि संकेतांवरून लोकोपायलटला समजते.

रेल्वेच्या लोकोपायलटला हिरवे सिग्नल दिसले की तो रेल्वेचा पुढचा प्रवास चालू करतो. लाल सिग्नल दिसताच रेल्वेला लगेच थांबवले जाते. कधीकधी पिवळे सिग्नल लागल्यावरही रेल्वे चालू होते. पिवळे सिग्नल सुरु होताच लोको पायलट रेल्वे हळूहळू चालवतो.

त्यामुळे यलो सिग्नलचा नेमका उपयोग काय असतो, ते समजून घेऊ या.. पिवळे सिग्नल लागताच रेल्वे सुरू करून ती मुख्य रुळावर आणली जाते. पिवळ्या सिग्नलचा तसा संकेत असतो. जेव्हा रेल्वे लुप लाईनवर असते तेव्हा अशा प्रकारचा पिवळा सिग्नल दिला जातो. लुप लाईनवरून मुख्य लाईनवर रेल्वे आणली जाते.

लुप लाईनवर कधीच हिरव्या रंगाचे सिग्नल नसते. लुप लाईनवर नेहमी रेड किंवा यलो सिग्नल असते. यलो सिग्नल लागल्यानंतर रेल्वेचा प्रवास सुरू होतो परंतु रेल्वेची गती ही 30 किमी प्रतितासपेक्षा जास्त नसते. मेन लाईनवर आल्यानंतर लोको पायलटला ग्रीन सिग्नल दिले जाते. त्यानंतर लोको पायलट रुल्वेचा वेग वाढवू शकतो.