AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपकेला धक्का! कॉकरोच जनता पार्टीचे 49 टक्के फॉलोअर्स पाकिस्तानी, भाजपच्या दाव्याने खळबळ

Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया फॉलोअर्सपैकी 49 टक्के फॉलोअर्स पाकिस्तानमधील असल्याचा गंभीर दावा भाजपने केला आहे. या आरोपांमुळे अभिजीत दिपके आणि CJP पुन्हा चर्चेत आले आहेत.

अभिजीत दिपकेला धक्का! कॉकरोच जनता पार्टीचे 49 टक्के फॉलोअर्स पाकिस्तानी, भाजपच्या दाव्याने खळबळ
Abhijit DipkeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 23, 2026 | 10:12 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी प्रचंड व्हायरल होत आहे. CJP ने फॉलोअर्सच्या बाबत भाजप आणि काँग्रेसलाही मागे टाकले आहे. मात्र आता भाजपने मोठा दावा केला आहे. या संघटनेच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधील लोकांचा समावेश आहे असं भाजपने म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार यांनी सांगितले की, ‘CJP चे सुमारे 49 टक्के फॉलोअर्स पाकिस्तानमधून आहेत, तर भारतातून फक्त 9 टक्के लोकच या मोहिमेला फॉलो करत आहेत.’ भाजप नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात एक खोटे कथानक तयार केले जात आहे असं विधान केले आहे.

भाजपचा गंभीर आरोप

भाजपच्या आरोपांनंतर हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. भाजपच्या केरळ युनिटचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत CJP वर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, ‘आजच्या काळात बॉट्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल प्रचाराचा वापर करून देशांना अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जातात. त्यांनी असेही सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाढती ताकद अनेक विदेशी हितसंबंधांना प्रभावित करत आहे आणि अशा मोहिमा त्याचाच एक भाग असू शकतात. मात्र विकसित भारत होण्यापासून देशाला कोणीही रोखू शकत नाही असंही भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.

अभिजीत दिपके यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर कारवाई

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी त्यांच्या डिजिटल संघटनेविरोधात कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दिपके यांनी सांगितले की, ‘अनेक अकाउंट्स हटवणे आणि हॅकिंगच्या घटनांनंतर आता संघटनेला कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटचा वापर करता येत नाही. माझे वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाउंटही हॅक करण्यात आले आहे. यापूर्वी भारतात CJP चे X अकाउंट ब्लॉक करण्यात आले होते, त्यानंतर त्यांनी नवीन अकाउंट तयार केले होते.

वेबसाईटवरही कारवाई

समोर आलेल्या माहितीनुसार CJP ने शिक्षण क्षेत्रातील अपयश आणि NEET-UG प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोहीम सुरू केली होती. त्यानंतर दिपके यांनी दावा केला की, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यांनी धमकीचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले होते. तसेच त्यांची वेबसाईटही बंद करण्यात आल्याचा आरोप दिपके यांनी केला होता.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ