AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! जगात काही तरी महाभयंकर घडणार, ट्रम्प यांच्या त्या चार शब्दांमुळे मोठी खळबळ, अमेरिका आता थेट इराणवर…

अमेरिकेनं इराणचा नवा प्रस्ताव देखील फेटाळून लावला आहे, दरम्यान अमेरिकेनं इराणचा नवा युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळताच डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, या पोस्टमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! जगात काही तरी महाभयंकर घडणार, ट्रम्प यांच्या त्या चार शब्दांमुळे मोठी खळबळ, अमेरिका आता थेट इराणवर...
donad trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 23, 2026 | 9:55 PM
Share

मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे, अमेरिकेकडून इराणला सातत्याने हल्ल्याची धमकी देण्यात येत आहे. इराणने अणु करार करावा यासाठी इराणवर दबाव निर्माण केला जात आहे. इराणने जर लवकरात लवकर अणु करार केला नाही तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा हल्ला करू, आमचं सैन्य तयार आहे असंही अनेकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवलं आहे. त्यात भरीस भर म्हणून इराणकडून अमेरिकेला नवा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, तो देखील अमेरिकेनं फेटाळून लावला आहे. अणू करार आणि पूर्ण युद्धविराम हे एकाचवेळी व्हावेत अशी आमची भूमिका असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे लवकरच मध्य पर्वेत काहीतरी भयंकर घडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तसेच अमेरिका इरामध्ये सैन्य घुसवणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा दाखवला आहे. त्यांनी या पोस्टवर मोठा संदेश लिहिणं टाळलं आहे, फक्त यूनाइटेड स्टेट ऑफ मिडिल ईस्ट एवढाच संदेश त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिला आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या चार शब्दांमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हा फोटो अशावेळी पोस्ट केला आहे, जेव्हा अमेरिकेनं इराणने पाठवलेला नवा प्रस्ताव देखील फोटाळून लावला आहे. इराणने अमेरिकेला युद्ध थांबवण्याबाबत नवा प्रस्ताव पाठवला होता, ज्यामध्ये त्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा ओपन करण्याची तयारी दाखवली होती, तसेच काही अटी देखील घातल्या होत्या, ज्यामध्ये अमेरिकेनं जप्त केलेली आमची संपत्ती मुक्त करावी, स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी उठवावी आणि युद्धात आमचं जे नुकसान झालं आहे, त्याची नुकसान भरपाई आम्हाला मिळावी असं इराणने म्हटलं होतं, मात्र अमेरिकेनं इराणचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, अमेरिकेनं इराणचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ