
पश्चिम आखातातील युद्धामुळे भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. देशभरात घरगुती गॅस सिलिंडर तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचे संकट निर्माण झाले आहे. गॅस बुक करूनही लोकांना वेळेवर स्वयंपाकाचा गॅस मिळत नाहीये.

दरम्यान, घरात गॅस सिलिंडर आणल्यानंतर तुम्ही कोणकोणती काळजी घ्यायला हवी, हे जाणून घेऊ या. तुम्ही एकदा घरात सिलिंडर आणले की ते नेहमी उभे ठेवावे. कोणताही ज्वलनशील पदार्थ सिलिंडरच्या जवळ नेऊ नये. गॅस शेगडी नेहमी सिलिंडरच्या कमीत कमी सहा इंच उंच ठेवावी.

गॅस पेटवताना अगोदर गॅस सुरू करू नका. अगोदर माचिस पेटवावी नंतर गॅस सुरू करावा. जेवण तयार करताना नेहमी सुती कपडे परिधान करावेत. ठराविक कालावधीनंतर गॅस सिलिंडरची तपासणी करावी.

तुम्हाला गॅस सिलिंडर, रेग्यूलेटर याबाबत कोणतीही शंका आली तर रेग्यूलेटर काढून सिलिंडरला सेफ्टी कॅप लावा. त्यानंतर सिलिंडर खुल्या जागेवर न्यावे. तत्काळा एलपीजी वितरकाला कॉल करावा. किंवा 1906 या क्रमांकावर कॉल करावा.

घरातील विजेची बटणं बंद करावीत. लगेच घराचा दरवाजा, खिडक्या उघडाव्यात. लवकरात लवकर मदत कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत. गॅस सिलिंडर तसेच कनेक्शन नियमित तपासल्यावर अपघाताची शक्यता कमी होते.