AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सराफा बाजारात मोठा बदल, सोन्याचे दर वाढले की कमी झाले ? जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे रेट..

Gold Rate Today 1 July 2026 Latest News Updates in Marathi: काही दिवसांपासून सोन्याचे भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता, मात्र आता सोन्याची चमक पुन्हा वाढली आहे. देशभरातील प्रमुख शहरात आज 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत ते जाणून घेऊया.

Gold Price Today : सराफा बाजारात मोठा बदल, सोन्याचे दर वाढले की कमी झाले ? जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे रेट..
1 जुलै रोजी देशातील विविध शहारतील सोन्याचे भाव किती ?
| Updated on: Jul 01, 2026 | 8:55 AM
Share

Gold Rate Today In India : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी होऊन, सलोख्यासाठी जे वाढते प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे भू-राजकीय तणाव निवळण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचा परिणा सोन्यावर झालेला दिसत असून सोन्याचे भाव वधारले आहेत; मात्र, औद्योगिक क्षेत्रातील मंद मागणीमुळे चांदीवर अजूनही दबाव कायम आहे. सोन्याचा विचार करायचा झाला तर एका दिवसाच्या घसरणीनंतर देशात ते महाग झालं आहे. गेल्या दोन दिवसांत 24-कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 120 रुपयांनी, तर 22-कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांनी वाढ झाली आहे. याआधी, 29 जून रोजी 24-कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 2020० रुपयांनी आणि 22-कॅरेट सोन्याच्या दरात 1850 रुपयांनी घट झाली होती. आजच्या बाबतीत सांगायचे तर, 24-कॅरेट आणि 22-कॅरेट अशा दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 10 रुपयांनी घट झाली आहे.

तर चांदीचा विचार करता, औद्योगिक क्षेत्रातील मंद मागणीचा या धातूवर दबाव निर्माण झाला असून त्यामुळे त्याची चमक ओसरली आहे. सलग तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर, चांदीच्या दरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे; या दोन दिवसांत चांदीच्या प्रति किलो दरात 5100 रुपयांची घट झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

देशातील 10 मोठ्या शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर किती त्यावरनजर टाकूया

शहर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर  18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 
दिल्ली ₹1,42,200 ₹1,30,360 ₹1,06,690
मुंबई ₹1,42,050 ₹1,30,210 ₹1,06,540
कोलकाता ₹1,42,050 ₹1,30,210 ₹1,06,540
चेन्नई ₹1,43,990 ₹1,31,990 ₹1,10,490
बंगळुरू ₹1,42,050 ₹1,30,210 ₹1,06,540
हैदराबाद ₹1,42,050 ₹1,30,210 ₹1,06,540
लखनऊ ₹1,42,200 ₹1,30,360 ₹1,06,690
पाटणा ₹1,42,100 ₹1,30,260 ₹1,06,590
जयपुर ₹1,42,200 ₹1,30,360 ₹1,06,690
अहमदाबाद ₹1,42,100 ₹1,30,260 ₹1,06,590

तीन दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदीही घसरली खाली

चांदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर, तीन दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी या धातूच्या किमतीत घट झाली आहे. या तीन दिवसांच्या स्थिरतेपूर्वी, 26 जून रोजी चांदीच्या दरात प्रति किलो 5000 रुपयांची वाढ झाली होती, तर 25 जून रोजी त्यात 10,000रुपयांची घट झाली होती. आज दिल्लीत प्रति किलो दरात 100 रुपयांची घट होऊन एक किलो चांदीचा दर हा 2,34,900 रुपयांवर आला आहे. इतर प्रमुख महानगरांचा विचार करता, मुंबई आणि कोलकातामध्येही चांदी याच दराने विकली जात आहे. मात्र, चेन्नईमध्ये प्रति किलो चांदी ही 2,44,900 या भावाने विकली जात आहे. म्हणजे या चारही शहरांपैकी चेन्नईत चांदी सर्वाधिक महाग आहे.

Follow Us
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा