
चेकचा उपयोग हा विविध प्रकारच्या आर्थिक व्यावाहारांमध्ये केला जातो. परंतु आता इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे चेकचा वापर कमी झाला आहे, मात्र अजूनही बँकेतील मोठ्या आर्थिक व्यावाहारांमध्ये चेकचाच वापर केला जातो.

चेकवर रक्कम टाकताना काही लोक लाखचा उल्लेख इंग्रजीमध्ये (lakh) असा करतात तर काही लोक लाखचा उल्लेख (lac) करतात.

चेकवर काय लिहावं lakh की lac काय आहे योग्य? दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आम्ही तुमचं कंफ्यूजन दूर करणार आहोत.

चेकवर lakh की lac काय लिहावं यावरून अनेक लोक कंफ्यूज होतात, दोन्ही स्पेलिंगमधील नेमका फरक त्यांच्या लक्षात येत नाही. या संदर्भात आरबीआयनं गाईडलाईन जारी केली आहे.

आरबीआयच्या गाईडलाईननुसार चेकवर रक्कम लिहत असताना तुम्हाला एकाचवेळी दोन्ही शब्दांचा उपयोग करता येणार नाही. जर तुम्हाला बँकेतून एक लाख रुपये काढायचे असतील तर तुम्ही चेकवर इंग्रजीमध्ये 'lakh' असा शब्द लिहू शकता, तिथे Lac चा उल्लेख चालणार नाही.

तसं पाहयला गेलं तर चेकवर तुम्ही 'lakh' आणि Lac असा दोन्ही पण लिहू शकता, बँक त्यावर ऑबजेक्शन घेणार नाही. तुमचा आर्थिक व्यवहार पूर्ण होईल.

मात्र आरबीआयच्या गाईडलाईननुसार चेकवर नेहमी 'lakh' असाच उपयोग करावा, lakh हाच शब्द योग्य आहे, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.