
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेकवेळा युद्ध झालेले आहे. पण प्रत्येकवेळी आम्हीच जिंकलो असा दावा पाकिस्तानी सैनिकांकडून केला जातो. आरोग्य चांगले राहावे तसेच शक्तीसाठी पाकिस्तानी सैनिक मांस आवडीने खातात.

पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात नेमके काय असते, याबाबत अनेकांना उत्सुकताही आहे. पाकिस्तानात सामान्य नागरिक असो किंवा सैनिक त्यांच्या आहारात बऱ्याचदा मांस असते.

नोकरीचे ठिकाण, नोकरीची वेळ आणि हवामान यानुसार पाकिस्तानी सैनिक आहारात बदल करतात. मात्र पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात मांसाला प्रमुख स्थान आहे.

पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात जास्तीत जास्त बकऱ्याचे मटण असते. सोबतच ज्या ठिकाणी जास्त थंडी असते तेथे पाकिस्तानी सैनिक बिफदेखील खातात.

यामुळे शरीरीतील उर्जा कायम राहते, असे पाकिस्तानी सैनिकांना वाटते. पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात कोंबडीचे मांसदेखील असते.