
व्हॉट्सॲपचे नियम आणि अटींचे उल्लंघन झाल्यावर कंपनी तुमचे व्हॉट्सॲप खाते बंद करते. जर तुम्ही या चुका केल्या तर तुमचे व्हॉट्सॲप खाते ब्लॉक, बॅन करण्यात येते. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सॲपचा वापर करु शकत नाही.

व्हॉट्सॲपसाठी कोणतेही थर्ड पार्टी ॲपचा वापर करु नका. GB WhatsApp, WhatsApp Plus आणि WhatsApp Delta सारख्या ॲपचा वापर केल्यास तुमचे व्हॉट्सॲप बंद होऊ शकते. तर इतर कुणाच्या माहिती आधारे व्हॉट्सॲप सुरु केले असेल तरीही कार्यवाही होते.

तुम्ही पुन्हा व्हॉट्सॲप खाते सक्रिय करु इच्छित असाल तर त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला WhatsApp वर जाऊन Request a review वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी तुम्हाला तुमची अडचण सांगावी लागेल. तसे लिहावे लागेल. सबमिट बटण दाबावे लागेल.

व्हॉट्सॲपला तुम्ही मेल पण करु शकता. व्हॉट्सॲपचा ई-मेल आयडी - Support@whatsapp.com असा आहे. त्यावर तुम्ही ई-मेल पाठवू शकता. My WhatsApp account temporally banned. I have already switched GB WhatsApp to official WhatsApp. please review and unban. असे लिहा आणि तुमचा व्हॉट्सॲप क्रमांक नोंदवा.

अजून एक पर्याय आहे. गुगलवर जाऊन WhatsApp support असे लिहा. आता कॉन्टॅक्ट WhatsApp ला क्लिक करा. या ठिकाणी - I Think my Whatsapp account banned by mistake.I strictly follow the rules and guidlines set by whatsapp and use the app responsibly. असा मॅसेज टाईप करुन पाठवा. या पर्यायांनी तुमचे खाते पुन्हा सक्रिय होऊ शकते.