काय नान्या, श्रीमंत झालास का? नाना पाटेकरांना असं का म्हणाले अशोक सराफ?

नानांचा स्वभाव हा फणसासारखा असल्याचं अशोक सराफ म्हणतात. बाहेरून जितका काटेरी, आतून तितकाच मधाळ आणि गोड. या दोघांच्या मैत्रीचा हा किस्सा अनेकदा नाना विविध कार्यक्रमांमध्ये सांगतात.

| Updated on: May 09, 2025 | 2:26 PM
1 / 5
अभिनेते अशोक सराफ आणि नाना पाटेकर हे सिनेसृष्टीतील अत्यंत दिग्गज कलाकार आहेत. 'हमिदाबाईंची कोठी' या गाजलेल्या नाटकात दोघांनी एकत्र काम केलं. या नाटकाच्या एका प्रयोगाच्या वेळी नानांनी अशोक सराफ यांचा जीवसुद्धा वाचवला होता. नानांनी त्यावेळी जे केलं त्याची मी कधीच परतफेड करू शकत नाही, असं अशोक सराफ आजही म्हणतात.

2 / 5
'मी बहुरुपी' या आत्मचरित्रात अशोक सराफांनी नानांचा आणखी एक किस्सा सांगितला आहे. नानांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवाला गणपती बाप्पाचं आगमन होतं. परंतु त्या काळात त्यांच्याकडे फार पैसे नव्हते. म्हणून एका वर्षी नानांनी अशोक सराफांकडे मदत मागितली होती.

3 / 5
नानांनी अशोक सराफांकडे तीन हजार रुपये मागितले होते. तेव्हा अशोक सराफांनी त्यांना थेट ब्लँक चेक दिला होता. गरज असेल तेवढी रक्कम घे, असं त्यांनी नानांना सांगितलं होतं. पण नानांनी मात्र मागितल्याप्रमाणे तीन हजार रुपयेच घेतले होते.

4 / 5
ही गोष्ट नंतर अशोक सराफ विसरून गेले होते. बऱ्याच दिवसांनंतर नाना त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, "हे घे, तुझे पैसे परत." त्यावर दुखावलेल्या अशोक सराफांनी म्हटलं, "काय नान्या, श्रीमंत झालास का?" त्यावर नानांनी दिलेलं उत्तर मी आजतागायत विसरलेलो नाही, असं अशोक सराफ म्हणतात.

5 / 5
नाना पटकन अशोक सराफ यांना म्हणाले, "नाही रे, पण मला पैसे परत करण्याची सवय लागू दे." हे उत्तर ऐकल्यानंतर अशोक सराफांनीही ते पैसे स्वीकारले. नानांचं हे उत्तर मलाही खूप काही सांगून गेलं होतं, असं अशोक सराफ म्हणतात.