
येमेनच्या तुरुंगात बंद असलेल्या निमिषा प्रियाच काय होणार? यावर सस्पेन्स कायम आहे. तलाल महदी हत्या प्रकरणात येमेनच्या कोर्टाने जो निर्णय दिलाय, त्यावर सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह निर्माण होतय.

तलालच्या हत्येत निमिषासह येमेनचीच नर्स हनानची सुद्धा भूमिका होती. निमिषानुसार हनानने तलालच्या शरीराचे तुकडे केले. पण येमेनी कोर्टाने हनानला फक्त आजीवन कारवासाची शिक्षा ठोठावली आहे.

येमेनच्या शरिया कोर्टाने हनानला या प्रकरणात दोषी ठरवलं. पण त्याला हत्येच मास्टरमाइंड ठरवलं नाही. हनानला जन्मठेपेची शिक्षा दिली. हनान सुद्धा निमिषासोबत सना जेलमध्ये बंद आहे.

निमिषाच्या जबानीनुसार तलालच्या हत्येची आयडिया तिला हनाननेच दिली होती. हनान येमेनमध्ये नर्सच काम करायची. निमिषाच्या घराखालीच ती रहायची.

हनानच्या सांगण्यावरुनच निमिषाने तलाल महदीला इंजेक्शन दिलं. निमिषानुसार इंजेक्शन दिल्यानंतर तलालचा मृत्यू झाला. तिने हनानला फोन केला. या दरम्यान तिने नियंत्रण गमावलेलं. मला काही समजत नव्हतं. मी झोपेचं औषध घेतलं.

या दरमान हनानने तलालच्या शरीराचे तुकडे केले व टाकीत ठेवले. त्यानंतर दोघे तिथून फरार झाले. येमेन पोलिसांनी नंतर दोघांना अटक करुन तुरुंगात पाठवलं.

येमेनी न्यायालयाने या प्रकरणात हनानला फक्त सहाय्यक मानलं आहे. म्हणून त्याला आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हनानला आता आयुष्यभर तुरुंगात रहावं लागेल.

निमिषाला फाशीची शिक्षा झाली आहे. येमेनच्या संविधानात 347 व्या भागात हत्येसंबंधी डिटेलमध्ये सांगण्यात आलय.

येमेनच्या संविधानानुसार हत्या, हत्येत सहभाग, ईशनिंदा, राजद्रोह सारख्या गुन्ह्यात मृत्यूच्या शिक्षेची तरतूद आहे. येमेनमध्ये अखेरचा निर्णय पॉलिटिकल काउंसिल घेते. येमेनमध्ये शरिया कायद्यातंर्गत किसास कायदा लागू केला जातो.

फाशी पुढे ढकलण्यात आली, हे आमच्यासाठी दुःखद आहे. कारण आम्ही आधीच सर्व प्रकारच्या तडजोडीचे प्रस्ताव नाकारले होते. जे लोक ही फाशी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना माहित आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य नाही, असं तलाल महदीचा भाऊ अब्देलफत्ताहने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलय.