वडिलांच्या निधनानंतर या अभिनेत्याने घरात ठेवलेली दारूची पार्टी, अमिताभ बच्चनही पाहून झालेले थक्क

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एकमेव अभिनेता ज्याने वडिलांच्या मृत्यूनंतर ठेवली होती दारूची पार्टी. मुलगा दारू पिताना पाहून हैराण झालेले अमिताभ बच्चन. कोण आहे तो अभिनेता?

| Updated on: May 08, 2026 | 11:44 AM
1 / 5
टीव्हीवर ‘हनुमान’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेता विंदू दारा सिंह यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे चढ-उतारांनी भरलेले आहे. कुस्तीचा वारसा, अभिनय क्षेत्रातील संघर्ष, प्रेमसंबंध, वाद आणि वडील दारा सिंह यांच्याशी असलेले भावनिक नाते यामुळे विंदू कायम चर्चेत राहिले.

2 / 5
त्यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही खास आणि भावनिक प्रसंग पुन्हा चर्चेत आले आहेत. 6 मे 1964 रोजी जन्मलेल्या विंदू यांच्या नावामागे ‘दारा सिंह’ हे मोठं नाव जोडलेलं होतं. दारा सिंह हे केवळ प्रसिद्ध कुस्तीपटू नव्हते तर रामायण मालिकेत त्यांनी साकारलेला ‘हनुमान’ आजही लोक विसरू शकलेले नाहीत.

3 / 5
‘जय वीर हनुमान’च्या शूटिंगदरम्यान घडलेला एक प्रसंग विंदू आजही विसरू शकलेले नाहीत. शूटिंगमध्ये ब्रेक झाल्यानंतर ते हनुमानाच्या वेशातच चहा पिण्यासाठी बाहेर गेले होते. त्यांना पाहताच रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी जमली. अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष देव मानत त्यांच्या पायांवर डोके ठेवले आणि आशीर्वाद मागू लागले. त्या क्षणी अभिनय आणि लोकांच्या श्रद्धेमधील नातं किती घट्ट असतं याची त्यांना जाणीव झाली.

4 / 5
विंदू यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक प्रसंग म्हणजे वडील दारा सिंह यांच्या निधनाचा. निधनापूर्वी दारा सिंह यांनी कुटुंबीयांना एक वेगळी इच्छा सांगितली होती. 'माझ्या मृत्यूनंतर कोणी रडू नये. माझं आयुष्य साजरं करा,' अशी त्यांची इच्छा होती.

5 / 5
वडिलांच्या निधनाच्या रात्री संपूर्ण कुटुंब घरात एकत्र जमलं. दुःखात बुडून न जाता त्यांच्या आठवणींना उजाळा देत शॅम्पेन उघडण्यात आली आणि त्यांच्या आयुष्याचा उत्सव साजरा केला जाऊ लागला. त्याचवेळी अचानक दारावर टकटक झाली आणि समोर उभे होते महानायक अमिताभ बच्चन. घरात शोककळा नसून आनंदाचं वातावरण पाहून अमिताभ बच्चन काही क्षणांसाठी थक्क झाले होते.

Follow Us