अजय देवगणसोबत दिसणारी ही अभिनेत्री आता काय करते? या कारणामुळे ‘सिंघम’ चित्रपटात केलेलं काम

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत दिसणारी ही अभिनेत्री आज कुठे आहे? या कारणामुळे अभिनेत्रीने सिंघम चित्रपटात केलंलं काम.

| Updated on: Jun 18, 2026 | 2:49 PM
1 / 5
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच 41 वर्षांची होणार आहे. 'सिंघम गर्ल' म्हणून ओळख मिळवलेल्या काजलने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

2 / 5
काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबई येथे झाला. अनेकांना वाटते की तिचा बॉलिवूडमधील प्रवास सिंघम या चित्रपटापासून सुरू झाला, मात्र प्रत्यक्षात तिने 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्यूं! हो गया ना...' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

3 / 5
 या चित्रपटात तिने ऐश्वर्या रायच्या मैत्रिणीची छोटी भूमिका साकारली होती. यानंतर काजलने दक्षिण चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला. 2007 मध्ये आलेल्या तेलुगू चित्रपट लक्ष्मी कल्याणममधून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. मात्र तिला खरी लोकप्रियता 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर 'मगधीरा' या चित्रपटातून मिळाली.

4 / 5
या चित्रपटात ती राम चरणसोबत झळकली होती. दक्षिणेत यश मिळवल्यानंतर काजलने पुन्हा हिंदी चित्रपटांकडे वाटचाल केली. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघम मध्ये तिने अजय देवगणसोबत प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि काजलला हिंदी प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली.

5 / 5
सध्या काजल अग्रवाल चित्रपटसृष्टीत सक्रिय असून सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी सतत संपर्कात असते. लवकरच तीश्रेयस तळपदे याच्यासोबत The India Story या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 26 जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

Follow Us