हिंदू धर्मात तुळस खूपच पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाला लक्ष्मी माता असते असे सांगितले जाते. मान्यतेनुसार तळशीचे रोप घरात ठेवल्यास सकारात्मक उर्जा संचारते. त्यामुळे कुटुंबात सुख आणि शांतता नांदते. परंतु तुळशीचे झाड घरात ठेवताना अनेकजण काही चुका करतात.

या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. काही जण तुळशीचे झाड घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून देतात. परंतु ते चुकीचे आहे. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुळशीचे झाड बेडरुममध्ये कधीच ठेवू नये. कारण बेडरुम ही खासगी जीवन घालवण्यासाठी असते.

बेडरुममध्ये तुळस ठेवल्यास नात्यात वितुष्ट निर्माण होते, असे म्हटले जाते. किचनमध्येही तुळस ठेवू नये असे सांगितले जाते. ही चूक केल्यास जेवण खराब होणे, अनावश्यक खर्च वाढणे अशा अडचणी येऊ शकतात. बाथरुम तसेच टॉयलेटमध्ये किंवा खिडकीत तुळस ठेवू नये.

बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये तुळस ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते, असे सांगितले जाते. तसेच तुळसीचे झाड घराच्या मुख्य दरवाजाच्या पुढे ठेवू नये. कारण यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच घरात नकारात्मकता वाढू शकते.