GK : जगातलं सर्वात मोठं झाड कोणतं आहे? नावा वाचून चकित व्हाल!
या जगात वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत. परंतु पृथ्वीवर असे काही वृक्ष आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून जिवंत आहेत. पृथ्वीवर सर्वात जुने झाड कोणते आहे, ते जाणून घेऊ या...

पर्यावरणाच्या संतुलनासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी पृथ्वीवर झाडांचे असणे खूप गरजेचे आहेत. आजघडीला पृथ्वीवर झाडांच्या लाखो प्रजाती आहेत. काही प्रजाती तर फारच दुर्मिळ आणि चमत्कारिक आहेत. पृथ्वीवर असे काही झाड आहेत जे शेकडो वर्षे जगतात.

तर काही झाड हे आकाराने फारच विशाल असतात. पृथ्वीवरचे सर्वात मोठे झाड नेमके कोणते आहे, असे नेमही विचारले जाते. आता याच झाडाबाबत आपण जाणून घेऊ या..मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील सिकोईया राष्ट्रीय उद्यानात हे झा आहे. हे झाड खूपच विशाल आणि महाकाय आहे.

सिकोईया नॅशनल पार्कमध्ये असलल्या जनरल शेरमेन या झाडाला पृथ्वीवरील सर्वात मोठे झाडा मानले जाते. या झाडाचे वय साधारण 2200 ते 2700 वर्षे असल्याचे सांगितले जाते. या झाडाने पृथ्वीवर झालेले अनेक बदल पाहिले असतील, असे म्हटले जाते.

जनरल शेरमेन हे झाड साधारण 275 फूट उंच आहे. हे जगातील सर्वात उंच झाड नसले तरीही ते सर्वात मोठे असल्याचे म्हटले जाते. या झाडाचे घनफळ (व्हॅल्यूम) तब्बल 52500 क्युबिक फूट असल्याचे सांगितले जाते. तर या झाडाचा व्यास 36 फूट आहे.

हे झाड साधारण 2000 वर्षांपेक्षाही जुने आहे. तरीदेखील ते अद्याप जिवंत आहे. घनफळाच्या दृष्टीने हे झाड जगातील सर्वात मोठे असे झाड आहे. चिलीमध्ये एक ग्रेट ग्रँडफादर नावाचे एक झाड आहे. या झाडाचे वय 5400 वर्षे असल्याचे बोलले जाते.