Strongest Beer : बिअरचा हा ब्रँड म्हणजे विषय खोल, एक पेग घेतला तरी डोकं झिंगतं; स्ट्राँग बिअरचे नाव काय?
अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची मद्यं पिण्याची सवय असते. काही लोक आवडीने बिअर पितात. परंतु काही बिअरच्या ब्रँडमध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मद्यप्राशन करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

आजकाल अनेकजण आवडीने मद्यप्राशन करतात. काही लोकांना बिअर फार आवडते. वेगवेगळ्या ब्रँडची बिअर पिणे हा काही लोकांचा छंद झाला आहे. मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक आहे, हे माहिती असूनही लोक मद्य पितातच. काही बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते.

तर काही बिअर या एकदम स्ट्राँग असतात. बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जेवढे जास्त, तेवढीच जास्त आणि लवकर नशा चढते. तसे पाहायचे झाले तर बिअरमध्ये साधारण 5 टक्के (अल्कोहोल बाय व्हॉल्यूम) अल्कोहोल असते. परंतु काही स्ट्राँग बिअरमध्ये यापेक्षा जास्त अल्कोहोल असते.

ब्रोकोड हा बिअरचा असाच एक ब्रँड आहे. ब्रोकोड बिअरमध्ये 15 टक्के अल्कोहोल असते. त्यामुळेच ही बिअर खूप स्ट्राँग मानली जाते. ही बिअर जास्त प्रमाणात पिऊ नये, असा सल्ला नेहमी दिला जातो.

गॉडफादर हा बिअरचा ब्रँडदेखील खूपच प्रसिद्ध आहे. या बिअरमध्ये साधारण 8 टक्के अल्कोहोल असते. भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बिअरमध्ये या ब्रँडचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. पंजाब, राजस्थान यासारख्या राज्यांत हा ब्रँड खूप प्रसिद्ध आहे.

(टीप- मद्यप्रशान हे आरोग्यास हानिकारक आहे. या स्टोरीच्या माध्यमातून मद्यप्रशानास प्रोत्साहन देण्याचा उद्देश नाही. मद्यप्राशनाची सवय लागल्यास समुपदेशक, डॉक्टरांशी संपर्क साधा.)