Jio, Airtel की Vi कोणाचं इंटरनेट सुपरफास्ट? उत्तर वाचून चकित व्हाल

Internet Speed : रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांचे मिळून भारतात 110 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. आज आपण यापैकी कोणत्या कंपनीचे इंटरनेट स्पीड फास्ट आहे ते जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Apr 24, 2026 | 7:56 PM
1 / 5
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे. जिओ आणि एअरटेलची 5G सेवा देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये उपलब्ध आहे, तर Vi ची 5G सेवा सध्या फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित आहे.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे. जिओ आणि एअरटेलची 5G सेवा देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये उपलब्ध आहे, तर Vi ची 5G सेवा सध्या फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित आहे.

2 / 5

सर्व टेलिकॉम कंपन्या आपली सेवा सर्वात वेगवान असल्याचा दावा करतात. मात्र आता स्पीडगोच्या अहवालातून इंटरनेट स्पीडबाबत कोण आघाडीवर आहे, हे स्पष्ट झाले आहे.

3 / 5

मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत जिओ देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 51 कोटी युजर्स असलेल्या जिओची सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड सुमारे 115.3 Mbps आहे.

4 / 5

एअरटेलची सरासरी स्पीड 84.3 Mbps आहे आणि व्होडाफोन आयडियाची सरासरी मोबाईल डेटा स्पीड 29.2 Mbps आहे. या कंपन्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

5 / 5

गेल्या काही महिन्यांत भारतातील इंटरनेट स्पीडमध्ये चांगली स्थिरता दिसून आली आहे. स्पीडमध्ये सुमारे 4 टक्क्यांची सुधारणा झाली आहे. भारतातील सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड सध्या 89.4 Mbps इतकी नोंदवली गेली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us