
मुंबई गुन्हे शाखेने गोरेगाव येथून एका बिल्डरकडून मागितलेल्या १० कोटींच्या खंडणीच्या पहिल्या हप्त्याच्या रूपाने १.५ कोटी रुपये स्वीकारताना मराठमोळी अभिनेत्री हमेलता पाटकर आणि तिच्या सहकारीला अटक करण्यात आली. तक्रारदार अरविंद गोयल यांनी आरोप केला आहे की ही रक्कम अंबोली पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्हेगारी प्रकरण मिटवण्यासाठी मागितली गेली होती. त्यानंतर अभिनेत्री हेमलता पाटकर चर्चेत आहे.

हेमलता पाटकर ही ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. अर्चना पाटकर या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहेत आणि दीर्घकाळ चाललेली लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' मध्ये कांचन देशमुखांची भूमिका साकारत आहेत.

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट 'लावू का लाठ' मधून त्या प्रथम चर्चेत आल्या, ज्यात त्यांनी लावणी कलाकार सुरेखाची मुख्य भूमिका साकारली होती. त्या काळात चित्रपटाच्या पोर्टल्समध्ये तिला प्रशिक्षित नर्तिका म्हणून दाखले गेले होते.

हेमलताने आयटम नंबर्स आणि छोट्या भूमिका साकरल्या होत्या. पण 'लावू का लाठ' चित्रपटाने तिला पहिली मोठी संधी मिळवून दिली. या चित्रपटात तिच्यासोबत विजय पाटकर, जयवंत वाडकर आणि विजय कदम दिसले होते.

सध्या हेमलताची चर्चा सुरु असताना तिचा चित्रपटातील जुना फोटो पुन्हा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये तिने गोल्डन रंगाची साडी नेसली आहे. तसेच त्यावर सोनेरी ज्वेलरी घातली आहे. पायात घुंगरु बांधलेले दिसत आहेत. सध्या फोटोची सर्वत्र चर्चा सुरु आहे.