कोबी कोणी खाऊ नये? कच्चा कोबी खाल्ल्याने काय होते?

कोबी आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी थायरॉईड, मधुमेह आणि पचनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी ती हानिकारक ठरू शकते. कोबी कोणी खाऊ नये आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत, याची सविस्तर माहिती येथे वाचा.

| Updated on: Jan 20, 2026 | 7:13 PM
1 / 6
कोबी ही भाजी आपल्या आहारात सर्रास वापरली जाते. कोबीमध्ये व्हिटॅमिन सी, के आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. मात्र, काही विशिष्ट लोकांनी कोबी खाणे टाळावे, असा सल्ला दिला जातो. यामुळे कोणत्या लोकांनी कोबी खाणे टाळावे किंवा मर्यादित ठेवावे, याची माहिती जाणून घेऊया.

2 / 6
कोबी हे 'क्रुसिफेरस' (Cruciferous) भाजीपाल्याच्या श्रेणीत येते. यामध्ये गोट्रोजेन्स (Goitrogens) नावाचे घटक असतात. हे घटक शरीरातील आयोडीन शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात, ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीच्या कामावर परिणाम होतो. ज्यांना हायपोथायरॉईडीझम आहे, त्यांनी विशेषतः कच्ची कोबी खाणे टाळावे.

3 / 6
कोबीमध्ये रॅफिनोज नावाची जटिल साखर असते. मानवी शरीराला ही साखर पचवणे कठीण जाते. यामुळे पोटात गॅस होणे, पोट फुगणे (Bloating), पोटदुखीचा त्रास होणे. ज्यांना इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) आहे, अशा व्यक्तींनी कोबी टाळणेच हिताचे आहे.

4 / 6
कोबीमध्ये रक्तातील साखर कमी करण्याचे गुणधर्म असतात. जे लोक मधुमेहासाठी आधीच औषधे घेत आहेत, त्यांनी कोबीचे अतिसेवन केल्यास त्यांची शुगर लेव्हल (Hypoglycemia) अचानक खूप कमी होऊ शकते.

5 / 6
जर तुमची कोणतीही शस्त्रक्रिया होणार असेल किंवा नुकतीच झाली असेल, तर आहारात कोबीचा समावेश करू नका. कोबी रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकते, ज्यामुळे रिकव्हरीमध्ये समस्या येऊ शकतात.

6 / 6
कोबीमध्ये व्हिटॅमिन-के (Vitamin K) भरपूर प्रमाणात असते, जे रक्ताच्या गुठळ्या होण्यास मदत करते. जर तुम्ही रक्त पातळ करण्याची औषधे (उदा. वॉर्फरिन) घेत असाल, तर कोबी औषधाचा प्रभाव कमी करू शकते.