
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गौतम गंभीरने आज राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. पाच वर्षांपूर्वीच गौतम गंभीरने राजकारणाच्या मैदानात प्रवेश केला होता.

गौतम गंभीरने अचानक राजकीय सन्यास का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. क्रिकेटच मैदान गाजवल्यानंतर गंभीरने राजकारणाच्या पीचवर दमदार एन्ट्री केली होती.

गौतम गंभीरने दिल्लीतून आम आदमी पार्टीच्या उमेदवारावर विजय मिळवला होता. गंभीरने तब्बल 6,95,109 इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. भाजपाचा दिल्लीतील तो प्रमुख चेहरा होता.

गौतमने आज टि्वटमध्ये म्हटलय की, "मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करा, अशी मी पक्षाध्यक्ष जे.पी.नड्ड यांच्याकडे विनंती केली आहे. क्रिकेटसाठी मी जी कमिटमेंट केलीय त्याकडे मला लक्ष देता येईल. मला लोकांची सेवा करण्याची जी संधी दिली, त्या बद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो"

गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती घेतलीय, त्यामागे त्याला भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणूक 2024 च तिकीट मिळणार नाही, हे सुद्धा एक कारण असू शकतं. आगामी निवडणुकीत भाजपा 70 ते 80 खासदारांच तिकीट कापणार अशी चर्चा आहे. कमकुवत कामगिरी हे त्यामागे कारण आहे. तिकीट नाकारण्यापेक्षा सन्माने एक्झिटचा पर्याय गंभीरने निवडला असावा.