
सध्या सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी हा विषय सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

24 कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा लाखाच्या घरात पोहोचली आहे, सोनं प्रचंड महाग झालं आहे. त्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक देखील वाढत आहे.

दरम्यान सोनं आणखी महाग होऊ शकतं असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे, त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होऊ शकतो.

पण तुम्हाला कधी आसा प्रश्न पडला आहे का? की तुम्ही जेव्हा सराफा दुकानात सोने किंवा चांदी खरेदी करायला जातात तेव्हा ते तुम्हाला गुलाबी रंगाच्या कागदामध्येच का गुंडाळून दिले जातात? आज आपण याचं उत्तर जाणून घेणार आहोत.

तुम्ही कोणत्याही सराफा दुकानात जा तुम्हाला या प्रकारचा कागद तिथे मिळणारच, याच गुलाबी कागदामध्ये तुम्ही खरेदी केलेलं सोन गुंडाळून ते तुम्हाला दिलं जातं.

याबाबत माहिती देताना एका सराफा व्यावसायिकानं सांगितलं की यामागे असं विशेष काही कारण नाही, परंतु ही अनेक वर्षांपासून चालत आलेली पंरपरा आहे, पूर्वी देखील याच कागदाचा वापर होत होता,आताही त्याचाच उपयोग होतो.

दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे गुलाबी रंगाचा कागद हा इतर कागदांपेक्षा थोडा मऊ असतो, त्यामुळे सोन्या सारख्या मौल्यवान धातुला क्रॅश पडत नाही, त्यामुळे देखील सराफा व्यावसायिक गुलाबी रंगाच्या कागदाचा वापर करतात.