प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रंगाची लाईन का असते? 99 टक्के लोकांना माहीतच नाही

रेल्वेने प्रवास करताना आपण अनेकदा प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रंगाच्या एक किंवा दोन सरळ लाईन पाहतो. मात्र, रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशाला देखील यामागील कारण माहिती नाही?

| Updated on: Apr 27, 2026 | 5:27 PM
1 / 5
रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्मवर ही पिवळी रेषा सुरक्षित अंतर दाखवण्यासाठी आखली जाते. गाडी येत असताना किंवा प्लॅटफॉर्मवर उभी असताना प्रवाशांनी या रेषेच्या मागे उभे राहावे, असा यामागचा उद्देश असतो. कारण वेगाने येणाऱ्या गाडीमुळे निर्माण होणारा हवेचा दाब प्रवाशांना पुढे खेचू शकतो.

2 / 5
तसेच, गाडी येताना किंवा सुटताना घाईगडबडीत अनेक अपघात घडण्याची शक्यता असते. अशावेळी ही पिवळी लाईन एक स्पष्ट इशारा देत असते की, यापुढे जाणे धोकादायक ठरू शकते.

3 / 5
विशेष म्हणजे, काही ठिकाणी या लाईनवर उठावदार टेक्स्चर्ड पृष्ठभाग असतो, ज्यामुळे अंध किंवा कमी दृष्टी असलेल्या व्यक्तींना प्लॅटफॉर्मवर सुरक्षितपणे चालता यावे आणि योग्य दिशा मिळावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

4 / 5
या टाइल्सवर उंचवटे, रेषा किंवा ठिपके असतात. अंध व्यक्ती आपल्या पांढऱ्या काठीच्या मदतीने किंवा पायांनी या उंचवट्यांचा स्पर्श करून दिशा ओळखू शकतात. सरळ रेषा असलेल्या टाइल्स चालण्याचा मार्ग दाखवतात तर गोल ठिपक्यांच्या टाइल्स पुढे धोका असल्याचा इशारा देतात.

5 / 5
ही पट्टी सहसा पिवळ्या रंगाची असते. कारण पिवळा रंग दूरूनही सहज लक्षात येतो. अल्पदृष्टी असलेल्या व्यक्तींनाही हा रंग स्पष्ट दिसतो, त्यामुळे त्यांना मार्ग ओळखणे सोपे जाते.

Follow Us