
बाळाचा जन्म झाला की सर्वात अगोदर ते रडायला लागतं. अनेकांना असे वाटते की बाळ जन्मल्यानंतर ते सर्वात अगोदर का रडते? त्याला हसू का येत नाही? बाळ रडत असेल म्हणजे त्याला काही त्रास होत असेल का? याच सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊ या...

बाळ साधारण 9 महिने आईच्या गर्भात असते. त्याचा जन्म झाला की ते बाहेरच्या जगात येते. आईच्या पोटात वेगळी उब असते, तापमान स्थिर असते, आवाज मंद असतो. बाळ बाहेर येताच त्याची ओळख बाहेरचा प्रकाश, थंडी, उन, बाहेरचा आवाज याच्याशी होते.

जन्म होताच बाळाचे शरीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करते. सर्वात अगोदर ते रडायला लागते. बाळ रडले की त्याची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांना समजून येते. बाळ रडायला लागले म्हणजे त्याचे शरीरा बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेत आहे.

जन्म झाल्यानंतर बाळाला रडू येणे फार गरजेचे असते. बाहेर आल्यानंतर बाळाचे फुफ्फुस, हृदय पूर्ण ताकदीने सक्रिय नसते. बाहेर येताच बाळ श्वास घ्यायला लागते. त्यामुळेच बाळ रडणे ही काही सामान्य प्रक्रिया नाही. बाळाच्या शरीरात बदल होत असल्याची हा एक मोठा संकेत आहे.

बाळ रडायला लागले म्हणजे त्याचे हृदय आणि फुफ्फुस चांगल्या पद्धतीने काम करत आहे, असा त्याचा अर्थ निघतो. आता बाळ अगोदर हसत का नाही? ते जाणून घेऊ या. हसणे ही एक भावनिक आणि सामाजिक प्रतिक्रिया आहे. बाळाचा जसाजसा विकास होतो, तसे बाळ हसायला शिकते.

बाळ जन्मल्यानंतर ते त्याला गरजेच्या असणाऱ्याची क्रिया करते. बाळ जसे जसे मोठे होते, तसे तसे त्याला बाहेरच्या जगाची ओळख होते. त्यामुळेच बाळ अगोदर रडायला शिकते. नंतर त्याला समजायला लागल्यानंतर ते हसायला शिकते.