माझा कारभारी लय भारी, पतीला कारभारणीने घेतलं खांद्यावर; नवरा सरपंच होताच पत्नीचा जल्लोष

खेड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीत कैलासराव शिंदे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या पत्नी राधिका शिंदे यांनी हा विजय अत्यंत भावूकपणे साजरा केला. त्यांनी आपल्या पतीला खांद्यावर उचलून जल्लोष साजरा केला.

| Updated on: Jun 27, 2025 | 4:01 PM
1 / 6
खेड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीत आज एक असा क्षण पाहायला मिळाला, ज्यामुळे उपस्थितीतांच्या डोळ्यात पाणी आलं आणि चेहऱ्यावर हसू फुलवलं.

2 / 6
कैलासराव शिंदे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड होताच, त्यांच्या पत्नी राधिका शिंदे यांनी विजयाचा जल्लोष अक्षरशः खांद्यावर उचलून साजरा केला.

3 / 6
राधिका यांनी आपल्या नवनिर्वाचित सरपंच पतीला थेट खांद्यावर उचलून घेतलं. त्यानंतर त्यांनी सर्व गावासमोर त्यांच्या यशाचा डंका वाजवला.

4 / 6
हा केवळ एका राजकीय विजयाचा जल्लोष नव्हता, तर एका पत्नीचा आपल्या पतीवरील अखंड विश्वास, त्याच्या नेतृत्वाची ताकद आणि एक स्त्री म्हणून गावासाठी काहीतरी करून दाखवण्याचा तिचा अट्टहास यातून स्पष्ट दिसत होता.

5 / 6
माझा नवरा फक्त माझा जोडीदार नाही, तर आता तो साऱ्या गावाचा आधार आहे, हेच राधिका यांच्या या कृतीतून दिसून आलं.

6 / 6
आंबोलीतील हा क्षण केवळ एका बिनविरोध निवडीचा नव्हता, तर एक जोडपं म्हणून जबाबदारीच्या आणि विकासाच्या वाटेवर एकत्र असल्याचे सांगत होता. या अनोख्या जल्लोषाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.