
आज बिहार विधानसभा निवडणुकीसह मध्यप्रदेश आणि अन्य काही राज्यांमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी पार पडत आहे. येत्या काही तासात नेमकी कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र आताची परिस्थिती पाहता भाजपा आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. दिल्लीतील भाजपाच्या मुख्य कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं दिसत आहे.

तर मध्यप्रदेशातसुद्धा भाजपा आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.

तसेच मध्यप्रदेशात भाजप मुख्यालयासमोरसुद्धा कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला आहे. या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतोय.

पाटण्यातसुद्धा भाजप महिला मोर्चाच्यावतीनं गुलाल खेळत आणि ढोल वाजवत आनंद साजरा केला जात आहे.

पाटण्यात शंखनादकरुन आनंद व्यक्त करण्यात आला आहे.