
येत्या सप्टेबर 2025 पर्यंत देशातील साधारण 75 टक्के एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा टाकाव्यात असे निर्देश आरबीआयने देशातील बँकांना दिले आहेत. या निर्देशानंतर आता देशात 500 रुपयांची नोट बंद होणार का? असे विचारले जात आहे.

या प्रश्नाचे उत्तर बँकिंग एक्स्पर्ट तसेच व्हाईस ऑफ बँकिंगचे संस्थापक अश्विनी राणा यांनी दिले आहे. देशातील एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा असाव्यात असे आरबीआयला वाटते. रोख व्यवहार करताना 500 रुपयांच्या नोटावरील अवलंबीत्त्व कमी व्हावे, अशी आरबीआयला वाटते. मोठ्या नोटांच्या मदतीने केले जाणारे व्यवहार कमी व्हावेत, असे आरबीआयला वाटते, अशी प्रतिक्रिया अश्विनी राणा यांनी दिली.

तसेच आता 2000 रुपयांची नोट व्यवहाराच्या बाहेर गेलेली आहे. अशाच पद्धतीने आरबीआय 500 रुपयांच्या नोटेसोबतही होऊ शकते. याबाबतची ठोस माहिती आरबीआय हीच संस्था देऊ शकते. मात्र तसा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी तसा निर्णय घेण्यात आलेला नाही. पण भविष्यात असं काही घडल्यास त्यात नवल वाटण्याचे कारण नाही, असे अश्विनी राणा यांनी म्हटलंय.

डिजिटल पद्धतीने होत असलेल्या व्यवहारांत वाढ होत आहे. आरबीआय भविष्यात ई-रुपी घेण्याच्या प्रयत्नात आहे. अशा स्थितीत चलनाची छपाई करण्यासाठी येणाऱ्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न आरबीआयचा आहे. नोटा छापण्यासाठी सरकारचा मोठा खर्च होतो. त्यामुळेच आरबीआय एटीएममध्ये कमी किमतीच्या नोटा टाकण्याला प्राधान्य देत आहे, असेही अश्विनी राणा यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या 500 रुपयांच्या नोटेवर बंदी घालण्यात आलेली नाही. 500 रुपयांची नोट चलणात चालू आहे. पण भविष्यात याबाबत काही निर्णय होऊ शकतो, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)