ओल्ड मंकवरील बंदी अखेर उठणार?, पण हा दर्जा जाणार, कोर्टात कंपनीने दिली ही कबुली

महाराष्ट्रात मे महिन्यापासून ओल्ड मंक विक्रीवर बंदी आहे. फूड रेग्युलेटर FSSAI ने यास रम मानण्यास नकार दिला आहे. आता कंपनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका मागे घेऊन नवीन लेबल जमा करण्यास तयार झाली आहे.

| Updated on: Nov 06, 2026 | 7:58 PM
1 / 7
भारताच्या सर्वात प्रसिद्ध मद्य ब्रँड्स पैकी एक असलेल्या ओल्ड मंकच्या विक्रीवर महाराष्ट्रात याच वर्षी मे- जून पासून बंदी आली होती.

भारताच्या सर्वात प्रसिद्ध मद्य ब्रँड्स पैकी एक असलेल्या ओल्ड मंकच्या विक्रीवर महाराष्ट्रात याच वर्षी मे- जून पासून बंदी आली होती.

2 / 7

थंडीत मोठ्या आवडीने रिचवली जाणारे हे मद्य अचानक बाजारात गायब होण्यामागे तिचा रम हा दर्जा कारणीभूत ठरला. देशाची फूड रेग्युलेटर म्हणजे भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) मते ही रम नाही.

3 / 7

या वादानंतर खोपोलीत ओल्ड मंकला तयार करणाऱ्या कंपनीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयातून आपली याचिका मागे घेतली आहे. कंपनीने म्हटले आहे की आता FSSAI जवळ कंपनी नवीन लेबल जमा करणार आहे.

4 / 7

हा संपूर्ण वाद बाटलीच्या लेबलने सुरु झाला आहे. FSSAI म्हणजे आहे की या ड्रिंकमध्ये बाहेरुन रमचा फ्लेवर मिक्स केला आहे. मात्र, बाटलीच्या लेबरवर स्पष्ट केलेले नाही की ही फ्लेवर्ड लिकर आहे की रम-फ्लेवर्ड स्पिरीट आहे.

5 / 7

नियामक यंत्रणेनुसार ही गोष्ट लपवून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. सप्टेंबरमध्ये कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान FSSAI चे वकील राजशेखर गोविलकर यांनी स्पष्ट केले आहे की रम म्हणून या मद्याला विकता येणार नाही.

6 / 7

FSSAI च्या मते न्युट्रल स्पिरिटमध्ये बाहेरुन रमचा फ्लेवर मिक्स करुन तयार केलेल्या उत्पादनाला रम म्हटले जाऊ शकत नाही. या शिवाय या नियामक संस्थेने बाटलीवर लिहिलेल्या सात वर्षे जुनी ब्लेंडेडच्या दाव्यावरही आक्षेप व्यक्त केला आहे.

7 / 7

FSSAI चे वकील राजशेखर गोविलकर यांनी कोर्टाला सांगितले की या फ्लेवरवाल्या या उत्पादनाला कोणत्याही खास लाकडी पिंपात ( बॅरल ) ठेवून जुने केले जात आहे. ओल्ड मंक बाटलीच्या लेबलवर रम सारखी ( rum-like ) लिहिले जावे, तेव्हाच तिच्या विक्रीला परवानगी दिली जाईल. त्यमुळे कंपनी अखेर असे लेबल कोर्टात जमा करण्यास तयार झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us