
महिला नेहमी त्यांच्या केसांबद्दल थोडी अधिक काळजी घेतात. केसांना दाट,लांब आणि सुंदर ठेवण्यासाठी त्या विविध प्रकारचे घरगुती उपचार करत असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का की चीनमध्ये असं एक गाव आहे की या ठिकाणच्या महिलांच्या केसांची चर्चा जगभरात होते.

चीनच्या गुईलिन प्रांतातील हुआंग्लु हे गाव. येथे याओ नावाचा एक समाज राहतो. तिथल्या महिलांनी लांब केस ठेवण्याची शतकानुशतक परंपरा आहे. चीनचे हे गाव 'लॉंग हेअर व्हिलेज' म्हणूनही ओळखले जाते.

याओ समाजातील महिला पूर्ण आयुष्यात फक्त एकदाच केस कापतात. येथे महिला जेव्हा स्वत:साठी जीवनसाथी शोधतात तेव्हा त्या आपले केस स्कार्फसह झाकतात.

मुलीचे कापलेले केस मुलीची आजी तिचं लग्न होईपर्यंत शोभेच्या बॉक्समध्ये ठेवते. लग्नानंतर मुलीचे हे केस तिच्या पतीकडे देण्याची प्रथा आहे.

या गावात दरवर्षी 3 मार्चला 'लाँग हेअर फेस्टिव्हल' साजरा केला जातो. ज्यामध्ये स्त्रिया गाणी आणि नृत्य करून आपले लांब सुंदर केस सादर दाखवतात. पर्यटक विशेषत: हा फेस्टिव्हल पाहण्यासाठी पोहोचतात. मात्र फक्त विवाहित महिलाच हे सादर करत असतात.