
टी-20 सामना हा अवघ्या 20 षटकांचा असतो. त्यामुळेच या सामन्यात तुम्हाला धावांचा अक्षरश: पाऊस पडलेला पाहायला मिळतो. फलंदाज प्रत्येक चेंडूवर चौकार, षटकार मारून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सध्या एका अजब टी-20 सामन्याची चर्चा होत आहे.

महिलांच्या टी-20 सामन्यात हा अजब प्रकार समोर आला आहे. या सामन्यात एकूण 11 खेळाडूंपैकी तब्बल 10 खेळाडू हे शून्यावर बाद झाले आहेत. एकाही खेळाडूला धावा करता आलेल्या नाहीत.

विशेष म्हणजे समोरचा दहा खेळाडू शून्यावर बाद झाल्यामुळे विरोधी संघाने हा सामना फक्त 2 चेंडूंमध्ये जिंकला आहे. त्यामुळेच या सामन्याची आता सगळीकडे चर्चा होत आहे. हा सामना नेमका कुठे खेळवला गेला असे विचारले जात आहे.

हा सामना राजस्थानमध्ये खेळवला गेला. राजस्थान क्रिकेट असोशिएशनतर्फे वरिष्ठ महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या निवडीसाठी जयपूर आणि उदयपूर या दोन शहरांत राज्य स्तरीय सिनियर महिला टी-20 सामने खेळवले जात आहेत. हा सामना याच टुर्नामेंटमध्ये सीकर आणि सिरोही या दोन जिल्ह्यांच्या संघांमध्ये खेळवला गेलेा होता.

या सामन्यात एका संघाचे अकरापैकी एकूण दहा खेळाडू शून्यावर बाद झाले आहेत. नवव्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूने 2 धावा केल्या आणि दोन धावा अतिरिक्त मिळाल्या.

त्यामुळे विरोधी संघाला एकूण चार धावांचे टार्गेट होते. समोरच्या संघाने अवघ्या दोन चेंडूंमध्ये हे टार्गेट पूर्ण केले आणि दणदणीत विजय मिळवला. याच सामन्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.