
अनेकजण वेगवेगळ्या परफ्यूच्या प्रेमात असतात. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम वापरायला आवडते. विशेष म्हणजे काही लोकांच्या परफ्यूमची किंमत तर हजारो, लाखो रुपयांच्या घरात असते. परंतु या जगात सर्वात महागडा परफ्यूम कोणता आहे, हे माहिती आहे का?

अनेकजण वाढदिवस, लग्नानिमित्त जवळच्या व्यक्तीला भेट देतात. काह फरफ्यूमधचा सुगंध हा प्रेमात पाडणारा असतो. विशेष म्हणजे नात्यात आलेला वितुष्ट घालवण्यासाठी काही लोक परफ्यूम भेट देऊन नाते सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात.

काही लक्झरी परफ्यूची किंमत मात्र खूपच जास्त असते. या जगात असाच एक परफ्यू आहे, ज्याची एक बॉटल खरेदी कराची असेल तर तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात. या परफ्यूची किंमत ही काही लोकांची आयुष्यभराची कमाई असते.

या अत्यंत महागड्या परफ्यूमचे नाव सुमुख असे आहे. याची किंमत साधारण 12.9 लाख डॉलर म्हणजेच साधारण 11.7 कोटी रुपये आहे. दुबाईमध्ये असलेल्या नबील परफ्यूम कंपनीने या परफ्यूमची निर्मिती केलेली आहे. हा परफ्यून तीन लीटरच्या बॉटलमध्ये येतो. या बॉटलवर साधारण 3500 पेक्षा जास्त हिरे, मोती असतात.

या बॉटलवर सोने, चांदीदेखील असते. या परफ्यूममध्ये उद, चंदन, कस्तुरी, तुर्की गुलाबाचा वापर केला जातो. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा परफ्यूम हा साधारण 9 कोटी रुपयांना येतो. या परफ्यूमचे नाव गोल्डन डिलिशियस मिलियम डॉलर फ्रेगरेन्स असे आहे. हा परफ्यूम सफरचंदाच्या आकारात येतो.