
विराट कोहलीला भेटल्यावर त्याच्याकडून कौतुकाची थाप म्हणजे मोठी गोष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या खेळडूला पाहत श्रेयांका मोठी झाली, त्याने नाव घेत कौतुक करणं म्हणजे सोन्याहून पिवळं असल्यासारखं झालं.

विराट कोहलीसोबतचा फोटो श्रेयांकाने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने विराट पहिल्यांदा भेटला हे सांगितलं आहे. विराटमुळे मी क्रिकेट पाहायला लागले, त्याच्यासारखं होण्याचं स्वप्न पाहत मोठी झाले आणि बुधवारी रात्री माझा आयुष्यातील मोठा क्षण होता. माझा रोल मॉडेल म्हणाला, हाय श्रेयंका, चांगली गोलंदाजी केली, विराटला माझं नाव माहित असल्याचं श्रेयांकाने सांगितलं.

श्रेयांका पाटील हिने फायनल सामन्यामध्ये सर्वाधिक चार विकेट घेतल्या होत्या. दिल्लीच्या कॅप्टनला तिने माघारी धाडलं होतं. दुसऱ्या हंगामामध्ये तिने सर्वाधिक 13 विकेट घेत श्रेयांका पर्पल कॅपची मानकरी ठरली.

श्रेयांकाने भारतीय महिला क्रिकेट संघासाठी 2 एकदिवसीय आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. डिसेंबर 2023 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

स्मृती मंधानाच्या नेतृत्त्वाखाली आरसीबी संघाने ट्रॉफी जिंकली. मेन्स संघाला सोळा हंगाम झाले तरी अद्याप ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही. यंदा आरसीबीने आपल्या नावात आणि लोगोमध्ये बदल केला असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असं नाव केलं आहे.