
पाऊस हा प्रत्येकालाच आवडतो. पाऊस आला की सगळी सृष्टी हिरवीगार व्हायला लागते. परंतु या जगात असे एक गाव आहे ज्या ठिकाणी कधीच पाऊस पडत नाही. इथले लोक पावाच्या थेबाला अक्षरश: तरसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

येमेन देशात अल हुतैब नावाचे एक गाव आहे. या गावात कधीच पाऊस पडत नाही. विशेष म्हणजे वैज्ञानिक तसेच इतर अभ्यासकदेखील ही बाब समजताच आश्चर्यचकित होतात. या गावात पाऊस न पडण्यामागचं कारणही तसं खास आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मिळालेल्या माहितीनुसार अल हुतैब हे गाव समुद्रसपाटीपासून साधारण 3200 मीटर उंचीवर वसलेले आहे. सामान्यत: पाऊस पडण्यासाठी जमा होणारे ढग हे 1500 ते 2000 मीटर उंचवरच असतात. म्हणजेच पावसासाठी लागणारे ढग हे या गावाच्या खाली असतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

त्यामुळेच या गावात पाऊस पडत नाही. या गावातील लोक खाली पडत असलेला पाऊस आनंदाने पाहता. या गावात कधीही पाऊस होत नसल्याने तेथील तपामानही फार वेगळे असते. या गावात सकाळी सकाळी खूप हवा असते. सूर्य वर येताच तापमान खूप वाढते आणि गरमी होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

पाऊस नसला तरीदेखील या गावातील लोक शेती करतात. डोंगरावर हे लोक शेती करतात. पाणी साठवण्यासाठी येथील लोक जुन्या पद्धतीचा वापर करतात. या भागात येमेनी कॉफी खूप प्रसिद्ध आहे. येथील कॉफीचा स्वाद आणि सुगंध खूपच वेगळा असतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)