
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला सोनिया गांधी, अखिलेश, धार्मिक नेते, उद्योगपतींना आमंत्रण देण्यात आलं आहे. दुसऱ्यांदा शपथविधी होणार असल्याने मंज एकदम सजवण्यात आला आहे. आज सायंकाळी चार वाजता इकाना स्टेडियमध्ये हा सोहळा होणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

गुरूवारी आदित्यनाथ योगी यांची एकमताने विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आदित्य योगीनाथ यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांकडे आज सत्ता स्थापण करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शपथविधी सोहळ्याचं अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे कार्यकर्ते राज्यातील शक्ती केंद्रांजवळील मंदिरांमध्ये जाऊन लोककल्याणासाठी पूजा करणार आहेत.

योगी आदित्यनाथ

अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उत्तरप्रदेशातील मंत्रीमंडळ निश्चित करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अधिक महिलांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. विशेष म्हणजे अधिक तरूणांना सुध्दा संधी मिळेल.