‘झी मराठी अवॉर्ड्स 2025’च्या रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस जलवा

'झी मराठी अवॉर्ड्स २०२५'चा रेड कार्पेट सोहळा भावनांचा, आठवणींचा आणि प्रेमाचा उत्सव होता. आपल्या मालिकांमधील कलाकार एकत्र दिसले, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी, एकमेकांना दिलेल्या मिठ्यांनी, आणि प्रेक्षकांसोबत घालवलेल्या क्षणांनी हा सोहळा पार पडला. हा भव्य सोहळा 11 आणि 12 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

| Updated on: Oct 05, 2025 | 9:19 AM
1 / 5
'झी मराठी अवॉर्ड्स 2025' मुख्य सोहळ्याचं रेड कार्पेट यंदाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. सोहळ्याची सुरुवात झाली ती रेड कार्पेटवरील ग्लॅमर, उत्साह आणि जल्लोषात. एकापेक्षा एक लाजवाब पोशाख, आणि स्टाईलिश अंदाज हे क्षण प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहेत.

2 / 5
‘तारिणी’, ‘पारू’, ‘कमळी’, 'सावळ्याची जणू सावली, वीण दोघांतली ही तुटेना', 'तुला जपणार आहे', 'लाखात एक आमचा दादा' आणि  'चला हवा येऊ द्या' या मालिकांतील कलाकारांनी आपापल्या अंदाजमध्ये रेड कार्पेटवर एण्ट्री घेतली.

3 / 5
तारिणी-केदार, पारू-आदित्य, हृषी-कमळी, सावली-सारंग, सिद्धू-भावना, जयंत-जान्हवी, मीरा- अथर्व, सूर्या- तुळजा, श्रीनिवास-लक्ष्मी  यांचा सहज भाव, त्यांच्या नजरेतली चमक आणि चाहत्यांशी जोडलेलं हृदयस्पर्शी नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

4 / 5
यंदाच्या रेड कार्पेटवर झी मराठीच्या जेष्ठ कलाकारांची उपस्थिती सर्वात भावनिक ठरली. राजवडे आजी, सुरू आजी, आप्पा , गाडे पाटील आजी, अन्नपूर्णा आजी, अशा अनुभवी चेहऱ्यांनी वातावरणात एक वेगळीच गरिमा आणली.

5 / 5
त्यांच्यामागोमाग आलेल्या खलनायिका आणि खलनायक ‘देवमाणूस’ यांचं चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केलं. प्रत्येक कलाकाराचं रेड कार्पेटवरचं आगमन म्हणजे एक छोटा सोहळाच वाटत होता.