AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetty : पीएम किसान योजनेचा भोंगळ कारभार; …तरीही राजू शेट्टींच्या खात्यात 11 वा हप्ता जमा

पी.एम. किसान योजनेचा (P.M. Kisan Yojana) भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या खात्यात 11 वा हप्ता जमा झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Raju Shetty : पीएम किसान योजनेचा भोंगळ कारभार; ...तरीही राजू शेट्टींच्या खात्यात  11 वा हप्ता जमा
| Updated on: Sep 07, 2022 | 8:25 AM
Share

कोल्हापूर:  पी.एम. किसान योजनेचा (P.M. Kisan Yojana) भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या खात्यात 11 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पीएम किसान योजनेतून आपले नाव वगळण्यात यावे अशी मागणी अनेकदा संबंधित यंत्रणांकडे केली आहे. मात्र तरी देखील राजू शेट्टी यांच्या खात्यात पी.एम. किसान योजनेचा 11 वा हप्ता जमा झाला आहे. परंतु हप्ता जमा झाल्यानंतर शेट्टी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या खात्यातील पी. एम. किसानचे पैसे (money) पुन्हा तहसीलदारांकडे जमा केले आहेत.

पैसे परत केले

राजू शेट्टी यांनी अनेकदा संबंधित यंत्रणांकडे आपले नाव या योजनेतून वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे. आपण माजी खासदार असल्याने या योजनेतून माझे नाव वगळण्यात यावे असे राजू शेट्टी यांनी म्हटले होते.

मात्र तरी देखील पी.एम. किसान योजनेतून राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जमा करण्यात आला आहे.

माजी खासदार असल्याने माझे नाव या योजनेतून वगळा अशी लेखी मागणी राजू शेट्टी यांनी तहसीलदारांकडे केली होती. मात्र तरी देखील शेट्टी यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने हप्त्याचे सर्व पैसे शेट्टी यांनी तहसीलदारांकडे परत केले आहेत.

राजू शेट्टींची नाराजी

वारंवार विनंती करून देखील आपल्या खात्यात पुन्हा पीएम किसानचे पैसे जमा झाल्याने राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नको असणाऱ्यांना पैसे मिळतात, मात्र खरे लाभार्थी अद्यापही या योजनेपासून वंचित राहत असल्याचे शेट्टी यांनी म्हटलं आहे.

खात्यात पैसे जमा होताच शेट्टी यांनी आपले 11 व्या हप्त्याचे पैसे पुन्हा तहसीलदारांकडे परत केले आहेत. या कृतीमुळे शेट्टी यांच कौतुक होत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?