पाया पडणाऱ्या आदित्यला उदयनराजेंची जादू की झप्पी, आदित्यचीही राजेंसमोर कमिटमेंट!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray meet Udayanraje Bhosale) यांनी आज साताऱ्यातील पाटणमध्ये जाहीर सभा घेतली. पाटण विधानसभेचे शिवसेना उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली.

पाया पडणाऱ्या आदित्यला उदयनराजेंची जादू की झप्पी, आदित्यचीही राजेंसमोर कमिटमेंट!

सातारा : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray meet Udayanraje Bhosale) यांनी आज साताऱ्यातील पाटणमध्ये जाहीर सभा घेतली. पाटण विधानसभेचे शिवसेना उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले माजी खासदार उदयनराजे भोसलेही (Aaditya Thackeray meet Udayanraje Bhosale)  मंचावर उपस्थित होते.

उदयनराजे भोसले मंचावर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. मात्र त्याचवेळी उदयनराजेंनी पाया पडणाऱ्या आदित्य ठाकरेंना उठवत, त्यांना अलिंगन दिलं. उदयनराजेंनी आदित्यला एकप्रकारे जादू की झप्पीच दिली.

“मी उदयनराजेंचा फॅन आहे. त्यांना भेटायला आलो आहे. माझे भाग्य आहे की मी त्यांच्या शेजारी बसलो आहे. आतापर्यंत इथे राष्ट्रवादी जिंकायची आता राष्ट्रवाद जिंकेल. आताचे केंद्रातील सरकार जगात मोठे आहे, महाराज आले की आणखी मोठे होईल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘माझी पण कमिटमेंट

“इथे आमदार खासदारांसाठी प्रचाराची गरज आहे का? काँग्रेस- भष्ट्रवादी काँग्रेसला लोकांनी फेकून दिले आहे. इथे मी स्वत:साठी आलो आहे. मी निवडणूक लढवतोय, आपले अर्शावाद हवेत. मी पण महारांजासारखी कमिटमेंट करतोय, मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे”, असं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI