एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला? तेव्हा सरकार कुणाचं होतं?; आदित्य ठाकरेंचा सवाल

| Updated on: Sep 08, 2022 | 2:02 PM

पालिकेचा या प्रकरणाशी संबंध नाही. ती एक खासगी संस्था आहे. एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला? तेव्हा केंद्रात आणि राज्यात कुणाचं सरकार होतं? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला केला.

एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला? तेव्हा सरकार कुणाचं होतं?; आदित्य ठाकरेंचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: सणासुदीच्या काळात राजकारण करू नये. याकूब मेमन प्रकरणात काही तथ्य समोर आलं पाहिजे. त्या माणसाचं दफनच का झालं? तो अतिरेकी होता. त्याचं दफन करण्याची गरज नव्हती. दफन करायचं असेल तर एनओसी घ्यायची असते. ती घेतली नाही. ती का घेतली नाही? पालिकेचा या प्रकरणाशी संबंध नाही. ती एक खासगी संस्था आहे. एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला? तेव्हा केंद्रात आणि राज्यात कुणाचं सरकार होतं? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजपला (bjp) केला. टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयात विघ्नहर्त्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने याकूब मेमनची (Yakub Memon) कबर बांधण्यासाठी परवानगीच दिली कशी? असा सवालही त्यांनी केला. तसेच जे गद्दार आहेत. त्यांना गद्दार नाही म्हणायचे तर काय म्हणायचं? असा प्रश्नही त्यांनी केला.