AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तर चोराच्या उलट्या बोंबा, आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

भाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar attack on Maha vikas Aaghadi) यांनी भाजपचे 12 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.

या तर चोराच्या उलट्या बोंबा, आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
| Updated on: Dec 05, 2019 | 2:29 PM
Share

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar attack on Maha vikas Aaghadi) यांनी भाजपचे 12 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. हे वृत्त म्हणजे निव्वल अफवा आणि चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलार यांनी पत्रक प्रकाशित करुन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. (Aashish Shelar attack on Maha vikas Aaghadi)

“महाविकास आघाडीने अपक्ष आमदारांना आश्वासने देऊन ठेवली आहेत. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आले तरी साधे खातेवाटही करू शकले नाहीत. दिलेली आश्वासने पूर्ण करु शकत नाहीत. त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमधे अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत”, असं आशिष शेलार म्हणाले.

“भाजपातील डझनभर आमदार फुटणार असे धादांत खोटे आणि वास्तवाशी कुठलाही संबंध नसलेले वृत्त आज सूत्रांच्या हवाल्याने काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही निव्वळ अफवा आहे. तिघाडीच्या नेत्यांकडून अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. चोराच्या उलट्या बोंबा मारणे सुरु आहे. भाजपमध्ये अन्य पक्षातून आलेले असो वा मूळ भाजपचे असलेले आमदार सर्वजण पक्ष शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केले त्यामुळेच आश्वासक, प्रभावी, पारदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन अन्य पक्षातून अनेक आमदार भाजप मध्ये आले”  असं आशिष शेलार म्हणाले.

सत्ता स्थापनेच्या काळात भाजपला या सर्व आमदारांवर विश्वास असल्यानेच, त्यांना तिघाडीच्या आमदारांप्रमाणे डांबून ठेवावे लागले नाही. कुणीही कुठल्याही प्रकारे पक्ष शिस्त मोडली नाही. तिन्ही पक्षांनी आमदारांना डांबून ठेवले. मोठमोठी आश्वासनं दिली. प्रत्यक्ष आता काहीच घडत नाही. त्यामुळे त्यांच्याच आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. सध्या तिघाडीचे जे सुरु आहे ते पाहून भाजपमधे अन्य पक्षातून आलेले आमदार म्हणत आहेत की, बरे झाले आम्ही भाजप मध्ये आलो, असा टोला शेलारांनी लगावला.

आम्ही 105 आमदार संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असून अनेक लोककल्याणकारी प्रकल्प बंद करून विनाशाचे काम करणाऱ्या या सरकारला लोकांच्या प्रश्नांवर  आम्ही सळो की पळो करुन सोडू, सत्तेची विनाशकारी तिघाडी केलेल्या या पक्षांनी जरा आपल्या पक्षातील आमदारांच्या मनात नेमके काय चाललेय ? त्याचा एकदा कानोसा घ्यावा,असा सल्ला ही आमदार आशिष शेलार यांनी दिला.

संबंधित बातम्या  

आम्हाला परत घ्या, भाजपच्या डझनभर आमदारांचं ‘मविआ’पुढे लोटांगण?

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.