“मी माझ्या मतदारसंघात भाजपसोबत युती करणार नाही!”, शिंदेगटातील मंत्र्यांचं मोठं विधान

शिंदेगटातील मंत्र्यांने युतीबाबत मोठं विधान केलंय. काय म्हणालेत पाहा...

मी माझ्या मतदारसंघात भाजपसोबत युती करणार नाही!, शिंदेगटातील मंत्र्यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 12:51 PM

दत्ता कानवटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, सिल्लोड औरंगाबाद : उद्धव ठाकरेंशी फारकत घेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह समर्थक आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर भाजपसोबत (Devendra Fadnavis) युती करण्याच्या मुद्द्यावर हे सगळे आमदार अडून राहिले. पण सध्या याच युतीबाबत शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठं विधान केलंय. “मी माझ्या मतदारसंघात भाजपसोबत युती करणार नाही. मैत्रीपूर्ण लढत करेल”, असं सत्तार म्हणाले आहेत.

माझ्या मतदार संघात माझी ताकत मोठी आहे. सोयगाव नगरपरिषदमध्ये आमचे 17 नगसेवक आहेत. तर भाजपचे 2 नगरसेवक आहेत. सिल्लोडमध्येही तीच परिस्थिती आहे. 30 पैकी 28 नगरसेवक आमचे आहेत. तर दोन भाजपचे आहेत. त्यामुळे सिल्लोडमध्ये मी भाजपसोबत युती करणार नाही. मैत्रीपूर्ण लढत करेन,असं सत्तार म्हणाले आहेत.

उद्या दसरा मेयलावा होतोय. त्यावरही सत्तार बोलले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्याचा मेळावा ऐतिहासिक होणार आहे, असं सत्तार म्हणालेत.

अब्दुल सत्तार यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावरही टीका केली आहे. दुश्मन भी जिंदा रहना चाहिये, असं सत्तार म्हणालेत.

“कैलास गोरंट्याल यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते काहीही आरोप करत आहेत. पण येणाऱ्या काळात जालन्यात बदल होणारच. त्याच्याकडे असलेली एक नगरपरिषद ती पण आम्ही काढून घेऊ. त्याची ताकत असेल तर त्याला सिल्लोडमध्ये येऊन आपली ताकत दाखवावी. त्यांनी इथे एक जरी नगरसेवक निवडून आणला तर मी त्यांचा सत्कार करेन”, असं सत्तार म्हणालेत.

मी मोठ्या लोकांना धोका देऊ शकतो. गोरंट्याल क्या चीज है!, त्यांना धोका देणं अवघड नाही. कैलास गोरंटयाल मुसलमानांना उल्लू बनवण्याचे काम करतात. त्याच्याकडची विधानसभेची जागा आणि नगरपालिका हिसकवून घेतो, असं सत्तार म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.