आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते राज्यपालांच्या भेटीला

युवासेनेचे प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray meet Governor) यांच्यासह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते राज्यपालांच्या भेटीला

मुंबई: युवासेनेचे प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray meet Governor) यांच्यासह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेने ही भेट राज्यात परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाबाबत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, शिवसेना या निमित्ताने राज्यपालांची भेट (Aditya Thackeray meet Governor) घेत भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही बोललं जात आहे.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, सुनिल प्रभु, दिवाकर रावते, रामदास कदम या दिग्गज नेत्यांसह इतर सर्व आमदार देखील हजर होते. राजभवन येथे या सर्वांनी राज्यपालांची भेट घेतली. या बैठकीत शिवसेनेने राज्यपालांकडे राज्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली.

शिवसेनेने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “मागील काही महिन्यांमध्ये राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. अवकाळी पाऊस पडला. क्यार वादळामुळे जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे. अनेकांचा जीव गेला. 328 पाळीव प्राण्यांचाही जीव गेला. या सर्वांना शासनाची तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. राज्यातील जनतेला आधार देण्यासाठी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच राज्ययंत्रेणाला नियमांचा काथ्याकुट न करता सरसकट सर्व प्रकारची मदत तातडीने देण्याचे निर्देश द्यावेत.”

मागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेत कुणाला काय मिळणार यावरुन वाद सुरू आहे. एकिकडे शिवसेनेकडून 50-50 चा आग्रह धरला जात आहे. दुसरीकडे भाजपने असं काही ठरलंच नसल्याचं म्हणत शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीत तणाव वाढला आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI