Aditya Thackeray : बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची डरकाळी, कोकणातल्या दौऱ्यात नेमकं काय घडलं?

या आमदारांना रोज गद्दार म्हणूनही आदित्य ठाकरे हे पुन्हा पुन्हा डिवचत आहे. मात्र आता आदित्य ठाकरे फिरायला लागले, दौरे करायला लागले हे आधीच केलं असतं तर सेना फुटली नसती, अशीही टीका बंडखोर आमदारांकडून आदित्य ठाकरेवर होतेय.

Aditya Thackeray : बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची डरकाळी, कोकणातल्या दौऱ्यात नेमकं काय घडलं?
बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची डरकाळी, कोकणातल्या दौऱ्यात नेमकं काय घडलं?
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 01, 2022 | 5:04 PM

सिंधुदुर्ग : एकीकडे शिवसेनेच्या (Shivsena) भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण म्हणजेच संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या कोठडी मुक्कामी आहे. यावरून शिवसेनेने भाजपवर टीकेची झोड उडवली आहे. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचा अभिमान आहे, असे वक्तव्य केलंय. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात दौरा करत आहे. आदित्य ठाकरे यांची तोफ शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात धडाडली. 2014 नंतर आलेले आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवताहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तर या आमदारांना रोज गद्दार म्हणूनही आदित्य ठाकरे हे पुन्हा पुन्हा डिवचत आहे. मात्र आता आदित्य ठाकरे फिरायला लागले, दौरे करायला लागले हे आधीच केलं असतं तर सेना फुटली नसती, अशीही टीका बंडखोर आमदारांकडून आदित्य ठाकरेवर होतेय.

दीपक केसरकरांवर पहिला हल्लाबोल

आज आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडीत मध्ये शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसैनिकांचा मेळावा घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडली. इथल्या त्या व्यक्तीबद्दल बोलणार नाही. काही बोललो तर वय काढतात माझं, असा उपहासात्मक टोला देखील लगावला. गद्दार असा शिक्का माथ्यावर घेऊन फिरताहेत. त्या गद्दारांनी इथे यावं आणि ही गर्दी बघावी आणि लोकांच्या मनात काय भावना आहे ती ओळखून घ्यावी, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना नाव न घेता दिला.

आम्ही कोणती चूक केली?

माझ्या निष्ठा यात्रेला, शिव संवाद यात्रेला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. लोकं मला सांगताहेत की आम्ही तुमच्यासोबत आहोत, मातोश्रीसोबत आहोत. आनंद आहे मला; पण दुसरीकडे गद्दारी केल्याने वाईट देखील वाटतंय. लोकांना विचारतोय मी आम्ही काही चूक केली का? चूक केली असेल तर सांगा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पाठीत वार केला

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, आमची एक चूक झाली, आम्ही न बघता त्या 40 लोकांना कडाडून मिठी मारली, आपलं समजून मिठी मारली. त्यांच्या हातातील खंजीर आम्हाला दिसलं नाही. ते खंजीर त्यांनी छातीत न मारतात पाठीत वार केला, हे आमचं न बघणं चुकलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे ते बोलताना म्हणाले आमची दुसरी चूक म्हणजे आम्ही राजकारण केलं नाही. आम्ही केवळ समाजकारण केलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.