आदित्य ठाकरे यांचा दोन खासदारांसह पटणा दौरा, दौऱ्यात नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 23, 2022 | 7:26 PM

ज्यांनी काश्मिरमध्ये पीडीपीसोबत युती केली त्यांनी आमच्यावर टीका करू नये, असं आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावलं.

आदित्य ठाकरे यांचा दोन खासदारांसह पटणा दौरा, दौऱ्यात नेमकं काय घडलं?
तेजस्वी यादव, आदित्य ठाकरे
Image Credit source: PTI
Follow us on

पटणा – बिहारमध्ये जाऊन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, नितीशकुमार आणि तेजस्वी यादय यांच्याशी चांगली ओळख होती. कोविडकाळात फोनवर बोलणं चालायचं. कोविडमुळं प्रत्येक्ष भेटता आलं नव्हतं. त्यामुळं आता येऊन भेटल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

या भेटीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. या माध्यमातून प्रेमाचं एक वेगळं नातं आम्ही पुढं घेऊन जाऊ शकतो, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तेजस्वी यादव यांच्याशी माझी भेट होणार होती. निघताना उद्धव ठाकरे यांनी विचारलं की, नितीशकुमार यांच्याशी भेट होणार का. कारण उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांचे संबंध आधीपासून होते.

आज आल्यानंतर नितीशकुमार यांना विचारलं. त्यांनी भेट दिल्याचं आदित्य म्हणाले. दोन राज्यातील दोन तरुण नेते एकमेकांना भेटलो. मी आणि तेजस्वी यादव हे ३२-३३ वर्षांचे आहोत. त्यांचं चांगलं काम चाललं. त्यामुळं त्यांना भेटायला आलो.

लालूप्रसाद यादव यांनी हिंदुत्व सोडलं होतं. त्यांच्या मुलाला भेटल्याची टीकाही भाजपकडून केली जाते. यावर ज्यांनी काश्मिरमध्ये पीडीपीसोबत युती केली त्यांनी आमच्यावर टीका करू नये, असं आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावलं.

आदित्य ठाकरे यांचा एक दिवसाचा दौरा होता. पटणा येथील विमानतळावर ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई हे दोन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते. आदित्य ठाकरे यांचा हा दौरा पुढच्या राजकीय दृष्टिकोनातून किती महत्वाचा असेल हे समजू शकेल.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त पटणा विमानतळावर होता. खासगी विमानानं आदित्य ठाकरे दोन खासदारांसह पटणा येथे गेले होते. पावणेतीन वाजता पटणा विमानतळावर आदित्य ठाकरे पोहचले. त्यानंतर सायंकाळी खासगी विमानानं ते परतले.