Sanjay Jadhav: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर बंडू जाधव यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले…

Sanjay Jadhav statement on Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमधील शेतकरी मेळावा रद्द करण्यासाठी शिंदे गटाचे खासदार संजय जाधव यांना फोन केला होता. मात्र, ऐनवेळी कार्यक्रम रद्द करता येणार नाही असे संजय जाधन यांनी म्हटले आहे.

Sanjay Jadhav: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर बंडू जाधव यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले...
Bandu jadhav
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 30, 2026 | 12:19 PM

मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी परभणी येथे होणारा शेतकरी मेळावा रद्द करण्यासाठी आयोजक शिंदे गटाचे खासदार बंडू जाधव यांना फोन केला होता. त्यांनी फोन करुन हा मेळावा रद्द करावा अन्यथा मी तिथे येईन असा इशारा दिला होता. आता यावर संजय जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आक्रमक होऊ नये अशी विनंती केली आहे.

काय म्हणाले संजय जाधव?

माध्यमांशी बोलताना बंडू जाधव म्हणाले की, जरांगे पाटील यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे. आणि 11 वाजता आपला नियोजीत कार्यक्रम आहे. जवळजवळ 15 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी चालू होती. मला सकाळी 11 वाजताच फोन आलाय की कार्यक्रम रद्द करा. मी दादाला विनंती केली की दादा तुम्ही मला रात्री जरी बोलले असते तरीही मी कार्यक्रम रद्द केला असता. आता लोक येऊन बसले आहेत आणि आता मी कार्यक्रम रद्द करावा असं माझ्या मनाला सयुक्तिक वाटत नाही. ज्या तुमच्या भावना आहेत त्या माझ्याही आहेत. तुमच्यापेक्षा माझ्या भावना वेगळ्या नाहीत. तुमच्या प्रत्येक भावनेशी आम्ही एकरुप आहोत. त्यामुळे असं काही वेगळं सांगयची गरज नाही.

पुढे ते म्हणाले, परंतु आता नियोजित कार्यक्रम, सगळं ठरलेलं, सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे, सगळे आले आहेत, लोक आलेत आणि कार्यक्रम अचानक रद्द करा असे नाही होणार. तुमच्या भावनांचा मी आदर करतो आणि मी तुमच्या भावनांशी एकरुप आहे, एकमत आहे. तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु कार्यक्रम रद्द होणार नाही. लोकांचाही रेटा तेवढा आहे. कारण कार्यक्रम इतक्या दिवसांपासून व्हायचा आहे आणि आता एकदमच एवढं सगळं झालेलं असताना हे अडचणीचा विषय आहे. तरी मी काय करता येतंय तो बघतो. पण कार्यक्रम घ्यावा लागेल एवढं मात्र नक्की.

मनोज जरांगे पाटील यांना केली विनंती

शेवटी बंडू जाधव यांनी म्हटले की, दादांचा तो अधिकार आहे. त्यांना काय बोलायचं आहे ते ते नैतिकतेने बोलतील. त्याविषयी मी काही बोलणार नाही. पण मी त्यांना विनंती करेन की दादा तुम्ही एवढे आक्रमक होऊ नका. शेवटी तुम्ही जे करताय आम्ही देखील तेच करतोय. त्यामुळे तुमचा जो निर्णय असेल, तुम्ही जी भूमिका घेतली असेल तिचे आम्ही समर्थन करतो आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेचा विरोध करतोय का? दादांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो.

Follow Us